राशीन येथे महात्मा फुले जयंती साजरी
महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रम होत असतात मात्र चालू वर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे शासनाने सांगितलेल्या निर्देशांचे पालन करत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 194 वी जयंती राशीन येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली.
यावेळी आमदार रोहित पवार,राशीन दूरशेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शिरसाट,कामगार तलाठी जितेंद्र गाढवे , शामभाऊ कानगुडे,संग्राम पाटील, ज्योतिराम काळे,महात्मा फुले संघटनेचे अध्यक्ष कुंडलिक सायकर,दीपक बेलेकर,डॉ.विलास राऊत,सुभाष सायकर,मिलींद राऊत,ऍड. बाळासाहेब रगडे,वाल्मिक सायकर, आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
राशीन गावची शोभा वाढवण्यासाठी आणि महात्मा फुलेंचे कार्य समाज्यापर्यत पोहचवण्यासाठी येथील महात्मा फुले चौकामध्ये सर्कल तयार करून त्यामध्ये गावाची शोभा वाढविण्यासाठी कलाकृती करण्यात येणार असल्याचे यावेळी आ.रोहित पवार यांनी सांगितले.