रेशनवर गव्हाऐवजी मका वाटप : पूर्वीप्रमाणेच धान्य देण्याची मागणी
रेशनवर गव्हाऐवजी मका वाटप : पूर्वीप्रमाणेच धान्य देण्याची मागणी
कर्जत प्रतिनिधी ( दिलीप अनारसे) कर्जत तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून रेशन कार्ड धारकांना गव्हाचा कोटा कमी करून मका दिला जात आहे मात्र याबद्दल रेशन लाखातून मका घेताना नाराजीचा सूर उमटत आहे.
गत वर्षी सरकार कडून लॉकडाऊन मध्ये मक्याची खरेदी विक्रीमी झाली असल्याने गव्हाचा कोटा कमी करून शासनाने हा मका रेशन कार्ड धारकांच्या माथी मारला आहे. गेल्या दोन महिन्यापासून रेशन कार्डधारकांना गव्हाऐवजी ऐवजी मकाच घ्यावा लागत आहे काही ग्राहक मका घेण्यास नकार देत आहेत परंतु नाइलाजाने त्यांना तो घ्यावाच लागत आहे पूर्वीप्रमाणे रेशन कार्डधारकांना गहूच द्यावा कारण मका खाण्याची सवय नाही असे ग्राहकातून बोलले जात असून रेशन कार्डधारकांना मक्या ऐवजी पूर्वीप्रमाणे गव्हाचेच वाटप करण्यात यावे व मका देणे बंद करावे अशी मागणी ग्राहकांन मधुन व्यक होत आहे. .स्वस्त धान्य दुकानात नागरिक धान्य घेण्यास गेले असता कायम मोठी रांग पहावयास मिळते. यासह रांगेत ताटकळत उभे राहताना कधी पॉज मशीनला रेंज उपलब्ध न होणे, अनेक जेष्ठ नागरिक यांचे हाताचे ठसे न उमटणे यासारखे प्रकार घडते. त्यामुळे अनेक वेळा वादाचे प्रसंग देखील उभे राहते. अशिही मागणी ग्रामस्तां मधुन करण्यात आली आहे.