रोज काही तास दुकाने सुरू करावीत त्या साठी शासनाने मान्यता द्यावी – Karjat Traders Association
कर्जत शहरासह तालुक्यातील व्यापारी बाजारपेठ आवश्यक निर्बंध घालून चालू करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन व्यापारी असो. च्या वतीने कर्जत येथे प्रांताधिकारी तहसीलदार नगर पंचायत चे मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
कोरोनाचा कहर वाढत असल्याने शासनाच्या निर्देशाने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून 5 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आलेले असून गेली वर्षभर कोरोनामुळे अनेक व्यावसाईकाचे मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे पुन्हा बंद च्या बडग्याने व्यावसाईक मोठ्या अडचणीत सापडणार असून रोज काही तास दुकाने सुरू करावीत त्यास शासनाने मान्यता द्यावी अशी मागणी करणारे निवेदन कर्जत मधील व्यापाऱ्यांनी प्रांतअधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दिले यावेळी व्यापारी असो. अध्यक्ष अर्जुन भोज, मेनरोड व्यापारी असो. चे अध्यक्ष गणेश जेवरे, व्यापारी असो. चे उपाध्यक्ष प्रसाद शहा, सचिव बिभीषण खोसे, खजिनदार संजय काकडे, स्वप्नील देसाई, अभय बोरा, विजय तोरडमल, सुरेश नहार, सुनिल निलंगे, संतोष भंडारी, राम ढेरे, किशोर कुलथे, अभिकेष बोरा, अशोक लाळगे हे व्यापारी उपस्थित होते.