विज्ञनाचे तीन प्रमुख प्रकार
विज्ञानाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत आणि त्यातही त्याच्या मध्ये काही उपप्रकार देखील आपणास अभ्यासावयास मिळतात.
विज्ञनाचे तीन प्रमुख प्रकार आहेत
1) भौतिक विज्ञान :
2) रासायनिक विज्ञान :
3) जीव विज्ञान :
1) भौतिक विज्ञान : भौतिक विज्ञान ही विज्ञानाची एक अशी महत्वपुर्ण शाखा आहे ज्यात आपण उर्जा आणि पदार्थ यांचा सखोल अभ्यास करत असतो.ह्या सृष्टीमध्ये ज्या प्राकृतिक घटना घडत असतात त्यांचे विश्लेषण यात केले जात असते.
2) रासायनिक विज्ञान : रासायनिक विज्ञान ही विज्ञानाची एक अशी शाखा आहे जिथे आपण कोणत्याही पदार्थाचे गुण आणि त्याच्यात होणारे रासायनिक बदल यांचा अभ्यास करत असतो.
3) जीव विज्ञान :जीव विज्ञान ही विज्ञानाची एक अशी शाखा आहे ज्यात जीवांचे अध्ययन केले जाते.ज्यात जीवांची उत्पत्ती,विकास आणि कार्य इत्यादी अशा बाबींचे अध्ययन केले जात असते.