श्रीराम नवमी निमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरात 111 बाटल्याचे संकलन

 

कर्जत (प्रतिनिधी)दिलीप अनारसे:-कर्जत येथे श्रीराम नवमी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून 111 रक्तदात्यानी रक्तदान केले.

             कर्जत येथे श्रीराम जन्मोत्सव समिती कर्जत तालुका याच्या वतीने यावर्षी कोरोनाच्या काळात श्रीराम नवमी अत्यंत साध्या पद्धतीने साजरी केल्यानंतर   श्रीराम नवमीचे औचित्य साधत आज गणेश पेठ येथे रक्तदानशिबिराचे आयोजन केले. भव्य श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन प्रांतअधिकारी अर्चना नष्टे  यांचे हस्ते करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन

करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव राऊत, नगरसेवक सचिन घुले आदी मान्यवरासह स्नेहल देसाई, अतुल कुलथे, गजानन चावरे, राहुल सोनमाळी, उपस्थित होते. दिवसभरात 111 रक्तदात्यानी रक्तदान केले यासाठी अनुज कुलथे, कृष्णाराजे क्षिरसागर, हरिओम कुलथे, गणेश महाजन, सुशांत कुलथे, सत्यम घाडगे, ओंकार धारूरकर,  सागर सुर्वे, राज नहार, राजेंद्र येवले, प्रणव  रुद्राके यांनी विशेष परिश्रम घेतले. अर्पण रक्तदान पेढीने यावेळी अत्यंत चांगली सेवा देत सर्व रक्तदात्याचे आभार मानले. यावेळी सर्व मान्यवरांसह रक्तदान करणाऱ्यांना ऑक्सिजन देणारी रोपे भेट देण्यात आली.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy