(प्रतिनिधी)दिलीप अनारसे :-कर्जत येथील प्रसिद्ध सराफ व्यावसाईक सचिन कुलथे यांनी आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
आ. रोहित पवार यांच्या विकासाच्या नव्या दृष्टिकोनाला समर्थन देत अनेक जण राष्ट्रवादीकडे आकर्षित होऊ लागले असून नुकतेच काही प्रमुख लोकांनी आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला यामध्ये कर्जत शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसाईक सचिन कुलथे यांचा प्रवेश अनेकांना आश्चर्य व्यक्त करायला लावणारा आहे.
कर्जत शहरात धार्मिक विचाराचे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सचिन कुलथे यांची सर्वश्रुत ओळख आहे, अनेक वर्षांपासून त्याचे बंधू सोमनाथ कुलथे हे भाजपाचे नगरसेवक असताना ही व कुटुंबावर भाजपाचा शिक्का असताना सचिन कुलथे यांनी मात्र या सर्व राजकारणा पासून स्वतःला जाणीव पूर्वक दूर ठेवत स्वतःचा वेगळा ठसा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात उमटविला आहे, सोनार समाजाच्या संघटनेत अत्यंत सक्रिय असणाऱ्या सचिनशेठ कुलथे यानी कर्जत मध्ये श्री नरहरी महाराज सोनार यांच्या मंदिराच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावली आहे याशिवाय तालुक्यातील अनेक मंदिराच्या जिर्णोद्धारा मध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे, सार्वजनिक कामात कोठेही गरज पडेल तेथे त्याची मदत मिळत असते. अत्यंत शांत स्वभावाचे सचिनशेठ हे महाराज या नावानेच ओळखले जातात, अहमदनगर जिल्हा सराफ सुवर्णकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष असून संत कचरनाथबाबा सेवा मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते कार्य करत आहेत.
सचिन कुलथे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला एक अत्यंत सौज्ज्वळचेहरा मिळाला असून राजकीय पट मांडण्यात राष्ट्रवादीने अत्यंत खुबीने सुरुवात केली असून या माध्यमातून कर्जत शहराचा आगामी काळात चेहरा मोहरा बद्लण्यासाठी आ रोहित पवार यांनी आपल्या पक्षापासून सुरुवात केल्याचे या माध्यमातून पहावयास मिळत आहे.
You might also like