समाज व राष्ट्रहित साधणारे संशोधन करावेे – Rajendra Phalke
समाज व राष्ट्रहित साधणारे संशोधन करावे
महाविद्यालयीन प्राध्यापक पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोग व शासनाच्या धोरणानुसार त्या त्या वेळी अध्यापकांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण व्हावीच लागते, शिवाय आपल्या विषयातील अपेक्षित संशोधनही करणे गरजेचे आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी समाज आणि राष्ट्र हितास उपयुक्त ठरणारे संशोधन करावे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले.
दादा पाटील महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या महाविद्यालयीन प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता (सेट) परीक्षेत महाविद्यालयातील अध्यापक व विद्यार्थ्यांनी या परीक्षेत संपादित केलेल्या यशानंतर त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून फाळके बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे होते. यावेळी विशाल मेहत्रे, सचिन धांडे, उपप्राचार्य प्रा. भास्कर मोरे, डॉ. संजय ठुबे, डॉ. वसंत निकाळे, प्रा. अशोक पिसे, प्रा. माधुरी जाधव-गुळवे व महाविद्यालयातील अध्यापक उपस्थित होते.
प्रा. अमित नलवडे, प्रा. सागर वाघमारे (गणित) पूजा निकाळे (पदार्थविज्ञान), राहुल भोंडवे (रसायनशास्त्र), राहुल ठवाळ, किसन बजगे (भूगोल) यांनी राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत यश संपादन केले, त्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.