साडेतीन वर्षांनी सापडली शिर्डीतून बेपत्ता झालेली महिला !

 

शिर्डीतून अनेक भाविक हे बेपत्ता होत असतात ,या महिले मुळे आत हे प्रकरण उघडकीस आले आहेत .इंदूर येथील दीप्ती सोनी शिर्डीतून बेपत्ता झाल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी पोलीस आणि अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करत फटकारलं होतं. तसंच मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का, या दृष्टीने तपास करण्याचे निर्देश राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना दिले होते. त्यानंतर आता दिप्ती सोनी सापडल्या आहेत.

या महिला या १० ऑगस्ट २०१७ रोजी शिर्डी येथे हरवल्या होत्या त्यांची तक्रार देखील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली हाती .दीप्ती सोनी पती मनोज सोनी (वय 42 वर्ष) आणि मुलांसह 2017 मध्ये इंदूरहून शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या.

अखेर  तीन वर्ष चार महिन्यांनी त्या गुरुवारी म्हणजेच 17 डिसेंबर रोजी इंदूरमधील बहिणीच्या घरी सुखरुप परतल्या. मनोज सोनी यांच्या सासऱ्यांनी त्यांना फोन करुन दीप्ती बहिणीच्या घरी परत आल्याचं कळवलं. दिप्ती तीन वर्षांपासून इंदूरमध्येच राहत होत्या आणि मनोज यांच्या सासऱ्यांना त्या सापडल्या.”



You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy