Ahmednagar: वीज तोडल्या मुळे थकबाकीदार व शेतकरी चिंतेत..

 

Karjat  — मागील जवळजवळ वर्षभरात कोरोनो महामारीच्या संकटामुळे हाताला न मिळालेले काम,त्याचबरोबर अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील महावितरण ग्राहकांनी जवळजवळ वर्षभर महावितरणचे वीजबिल भरले नाही,त्यामुळे ते वरचेवर गेले.वरचेवर थकित बिल वाढतच आहे ही थकबाकी न भरल्याने थेट तोडण्याची कारवाई महावितरण करणार आहे.दरम्यान या कारवाईच्या आदेशाचे महावितरणच्या ग्राहकांना मात्र धास्ती घेतली आहे.

        गेल्या वर्षभरात महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते त्यामुळे वीज ग्राहकांची थकबाकी वरचेवर वाढतच गेली त्यातच विविध राजकीय पक्षांनी काळातील वीजबिल माफ करण्याची मागणी केली असल्याने माफ होईल या आशेने वीज ग्राहकांनी मात्र वीजबिल भरलेच नाही महावितरण कंपनीला मात्र दखभाल व दुरुस्तीचा खर्च भागवण्यासाठी आता अडचणी निर्माण झाल्याने व थकबाकीदारांची थकीत वीज बाकी भरावी नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा वीज वितरण ग्राहकांनाही वारंवार आवाहन करूनही ग्राहक वीजबिल भरत नसल्याने महावितरणचे मात्र दिवाळे निघू लागले आहे.

    वस्तुतः कोरोना लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण तसेच शहरी भागात असतील सर्व लोक घरीच होते.काहीही कामधंदा नव्हता त्यामुळे विजेचा वापरही मोठ्या नेहमीपेक्षा जवळजवळ दुपटीने वाढला होता. याकाळात टीव्ही,फॅन,फ्रीज,कूलर,एसी यासह लॅपटॉप,कॉम्प्युटर, मोबाईल आदि विजेवर चालणाऱ्या वस्तू 24 तास चालू राहिल्या होत्या,व त्याचा सर्रास वापर वाढला होता.त्यामुळे नेहमी येणाऱ्या वीजबिलापेक्षा कोरोना लॉकडाऊन काळात वीजबिल जास्त येणारच होते.हे मात्र सर्वसामान्यांच्या लक्षात आले नाही खरोखरच या काळात विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता हे ही खरे आहे.

      “जे ग्राहक नियमित वीजबिल भरणा करतात त्यांना कधीही कसलीही सवलत मिळत नाही त्यांचा कोणत्याही बाबतीत विचारही केला जात नाही त्यामुळे नियमित वीजबिल भरणा करणाऱ्याचाही विचार सवलतीच्या बाबतीत विचार होणे गरजेचे.”

      — बंडु शेगडे , शेगुड वीजग्राहक

    ” कोरोना महामारीच्या काळातील वीजबिलात सवलत देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन होता,त्याचा मोठा गाजावाजाही झाला होता परंतु,राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट पाहता हा निर्णय बासनात गुंडाळला गेला.”

     — चंद्रकांत आटोळे.खातगाव

      “विजबिल माफ करावे त्यात सूट द्यावी अशी मागणी मध्यंतरी केली जात होती त्यातच राजकारणी मंडळींनी कोरोना काळातील वीजबिल भरू नका असे सांगितल्याने ग्राहकांची मात्र गोची झाली व वीज बिल न भरल्याने त्याची थकबाकी मात्र वरचेवर वाढत गेली आता बिल भरण्याचा तगादा वीज वितरण कंपनीकडून केला जात आहे.”

      –सुदाम निकत ,ग्राहक.

      “वीज बिल भरू नका असे म्हणणारे राजकारणी मात्र आता गप्प बसले आहेत.”

      — पोपट क्षिरसागर,शेतकरी 

   “डिसेंबर 2020 पर्यंत तसेच,कोरोना काळातील थकबाकी आणि चालू विजबिलाची वसुली होणार असून,ग्राहकांनी टप्प्याटप्प्याने आपले वीजबिल भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे वारंवार आवाहन करूनही वीज बिल भरले जात नसल्याने आता शेवटचा पर्याय म्हणून थकली थकबाकीदारांची नाईलाजास्तव वीजजोडणी तोडण्यात येणार आहे तसेच शासनाने कृषी बिलासंदर्भात कृषी योजना 2020 अंतर्गत 50 टक्के वीजबिल माफ करण्याची योजना सुरू केली आहे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन वीजबिल भरून सहकार्य करावे असेही आवाहन विज वितरण कंपनी च्या आधीकार्याने केले आहे.”

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy