Ahmednagar News: या ठिकाणीं जोरदार पाउस आणि गारपीट शेतकऱ्यांचं मोठ नुकसान
पाथर्डी संगमनेर, नगर तालुक्यात विविध ठिकाणी आज दुपारनंतर गारांचा पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वीजेच्या कडकडाटासह पाऊस
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात सायंकाळी विजेंच्या कडकडाटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. हिवरगाव पठार गावाअंतर्गत असलेल्या शेंडेवाडी, सतेचीवाडी, पानदरा याभागात विजेंच्या कडकडाटसह अवकाळी पावसाने तुरळक हजेरी लावली.
पिकांचे मोठे नुकसान
पाथर्डी तालुक्यामध्येही काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वादळी वाऱ्याने शेती, फळ बागासह इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डांगेवाडी परिसरात गारपिटीने आंबा, कांदा, गहू ,हरबरा, मका भुईमुग व ऊसाचे नुकसान झाले.
संदर्भ: I live Nagar