BMC Bharti: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी!

0

BMC Bharti: सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्र तसेच हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे संगणक सहाय्यक कंत्राटी (DEO) यांची प्रथम महिन्यांसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याकरीता अति.आयुक्त महानगरपालिका यांची क्र. अति.आयुक्त. (प. 3) / डी/2839/08.12.2022 अन्वये मंजुरी प्राप्त झाली आहे. त्याकरीता खालील पदे कंत्राटी तत्वावर भरण्याकरीता दि.13.03.2023 ते 15.03.2023 या कालावधीत गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन स्वीकारले जातील. याची सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना खालील प्रमाणे आहे.
शैक्षणिक अर्हता :-
• उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
• उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय ( उच्चस्तर / निम्नस्तर) घेऊन उत्तीर्णझालेला असावा.
उमेदवाराने संगणक वापराबाबतचे MS-CIT (3 महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा ) शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असावा व याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
• उमेदवाराने मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असावा व याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे. डेटा एन्ट्रीचा वेग कमीतकमी ८००० की डीप्रेशन्स इतका अवगत असावा. एम.एस.वर्ड, एक्सेल व मुलभूत सांख्यिकिय तंत्राच्या संगणक प्रणालीची माहिती असावी.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या / शासनाच्या रुग्णालय / कोविड केअर सेंटर मध्ये किमान ६ माहिने काम केलेल्या उमेदवारास अधिक गुण दिले जातील.
वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय दिनांक 01 मार्च 2023 रोजी 45 वर्षापेक्षा अधिक असू नये.
मानधन :- रु. १८,०००/- ( अठरा हजार रुपये फक्त )
गुगल फॉर्म लिंक https://forms.gle/hn8hPi67ThnxSfAM7 अर्ज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर https://portal.mcgm.gov.in उपलब्ध होईल.
शैक्षणिक अर्हता पात्र उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल . )

Join Whatsapp GroupJoin Whatsapp Group
Leave A Reply

Your email address will not be published.