पुणे हादरलं..तिने लग्नाला नकार दिला , Boyfriend ची चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या !

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात एक धक्कदायक घटना समोर आली आहे . प्रियकराने लग्नाला नकार दिल्यानंतर एका बावीस वर्षीय तरुणीने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली आहे. दौंड तालुक्यातील ही घटना असून दौंड पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रियकराच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे.

अकरा मार्च रोजी साक्षी हिने तिचा भाऊ कौशल गायकवाड याला याप्रकरणी माहिती दिली आणि कौशल याने तिची समजूत देखील काढलेली होती मात्र ती तणावात असल्याकारणाने इतके टोकाचे पाऊल उचलेल असे कुणालाही वाटले नव्हते.

 

 

घरातील सर्व सदस्य झोपी गेल्यानंतर तिने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. तिचा भाऊ कौशल गायकवाड याने पोलिसात तक्रार दिलेल्या असून आरोपी प्रियकर निखिल साबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

 

पोलीस उपनिरीक्षक सुनिता चौरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Join Whatsapp GroupJoin Whatsapp Group

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *