Girls visit Karjat police station कर्जत पोलीस ठाण्यात मुलींची सहल..
![]() |
Girls visit Karjat police station .. |
मुलींना कुटुंबाप्रमाणेच आपलं हक्कच ठिकाण वाटावं यासाठी कर्जत पोलिसांची अनोखी संकल्पना..
पोलीस ठाण्यात मुली आणि महिलांनी निर्भय पणे यावे, आपल्या तक्रारी सांगाव्यात यासाठी आज कर्जत पोलिसांनी कर्जत शहरातील शाळा आणि कॉलेज च्या *मुलींची सहल कर्जत पोलीस ठाण्यात* काढली..
मुलींना बऱ्याच ठिकाणी जसे रहातो त्या परिसरात, बस स्थानकावर, प्रवासात येता-जाता, शाळा कॉलेज च्या परिसरात, ओळखीच्या नातेवाईकांकडून, अनोळखी फोन व्हाट्सअप्प वरून त्रास होत असतो. मुलींना तक्रार करण्याची इच्छा असते परंतु आपल्याला लोक काय म्हणतील, आपलीच बदनामी होईल या भीतीने मुली तक्रार देत नाहीत. सर्व त्रास सोसत असतात.
या सर्व तक्रारी देण्यासाठी मुलींनी पुढे येण्यासाठी, *मुलींना बोलते करण्यासाठी* हा कर्जत पोलिसांचा प्रयत्न केला आहे.
महिला दिनानिमित्त
दादा पाटील महाविद्यालय,
अमरनाथ विद्यालय,
कोटा इंग्लिश मिडीयम स्कूल,
डायनॅमिक स्कूल,
कन्या शाळा येथील 200 मुलींनी आणि त्यांच्या शिक्षिका यांना पोलीस ठाण्यात कशा प्रकारे कामकाज चालते याबाबत-
▶️तक्रार कशी घेतली जाते,
▶️महिला कशा प्रकारे तक्रार देऊ शकतात,
▶️भरोसा सेल,
▶️ठाणे अंमलदार, क्राईम रूम, गोपनीय विभाग, तपासी अंमलदार अशी सविस्तर माहिती चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, पोलीस जवान शबनम शेख, मनोज लातूरकर, अमित बर्डे यांनी दिली.
मुलींना अल्पोपहाराची ची व्यवस्था करण्यात आली होती.
खूप चांगल्या प्रतिक्रिया मुलींनी व्यक्त केल्या..