Grampanchayt nivdnuk:नविन कारभारी कोण ? काही तासात होणार फैसला ! ! !
कर्जत(दिलीप अनारसे) कर्जत तालुक्यातील 56ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली,त्यापैकी 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर 54 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार (ता.15) रोजी शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात मतदान झाले.कुठेही गडबड अथवा गोंधळ झाला नाही. तालुक्यात सरासरी 88.% एवढे मतदान झाले अतिशय चुरशीने परंतु खेळीमेळीच्या वातावरणात मतदान संपन्न झाले.मतदान झालेल्या 54 गावामध्ये कारभारी निवडणुकीसाठी निवडणूक पार पडली असली तरी याचा निकाल मात्र निकाल लागे पर्यंत वाट पाहावी लागणार असून गावच्या कारभारी कोण होणार ? कोणाच्या ताब्यात जाणार ?याबाबत तालुक्याला उत्सुकता लागली आहे.तालुक्यातील 54 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले असले तरी,राजकारणात ग्रामपंचायतीला महत्वाचे स्थान असल्याने मतदानासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी जीवाचे रान केले असले तरी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर कोणाची पार्टी येणार ? कोण बाजी मारणार ? गाव कोणाकडे जाणार ? कोणाचा नेता पावरफुल होणार ? हे आता स्पष्ट होणार आहे. दिलेल्या आश्वासनाचा काय परिणाम होणार ? कोणाचे नशीब बदलणार हे सोमवार रोजी मतमोजणी दिवशीच समजणार आहे. त्यामुळे तालुकावाशीयांचे लक्ष लागले आहे. कोण होणार राजा आणि कोणाचा वाजणार बाजा याविषयी गावागावात चर्चा सुरू आहे. दरम्यान 54ग्रामपंचायती तालुक्यासाठी महत्त्वाच्या असल्या तरी ग्रामपंचायतीकडे मात्र तालुकावाशीयांचे लक्ष लागणार आहे.
गत निवडणुकीत सरपंच जनतेमधून निवडला गेला होता यावेळी मात्र महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलत पुन्हा सदस्यामधूनच सरपंच निवडण्याचे जाहीर केले त्यानुसार 8 डिसेंबर 2020 रोजी सरपंच आरक्षण काढण्यात आले मात्र निवडणुकीच्या तोंडावर हे आरक्षण रद्द करण्यात आले त्यामुळे निवडणुकीच्या काळात पॅनेलप्रमुखांवरच या निवडणुकीची जबाबदारी पडली व सर्व उमेदवारांना रहीजबाबदारी पार पाडावी लागली 18 जानेवारी चा निकाल लागल्यानंतर 22 जानेवारीला आरक्षण काढण्यात येणार आहे त्यानुसार नवीन सदस्यांमधून सरपंच निवड होणार आहे.
मतदानादिवशी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी जीवाचे रान केले असले तरी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर कोणाचे पारडे जड कोण जिंकणार याविषयी चर्चा मात्र पारावर, मंदिरात तसेच सर्व ठिकाणी होत होत्या.
या बरोबरच निकालानतंर विदयमान आमदार रोहीत पवार, माजी आमदार राम शिंदे, व यांच्याकडे किती ग्रामपंचयती जाणार ? हे पाहणे मात्र औरत्युक्याचे घ्यायचे ठरणार आहे.
त्यामुळे 26 जानेवारीला झेंडा फडकवणार ? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. कोण होणार राजा आणि कोणाचा वाजणार बाजा याबाबत गावात चर्चा सुरू आहे दरम्यान मतदारानी मोका साधल्याने उमेदवाराचा मात्र ठोका चुकतोय असेच दिसत आहे.शहरी भागातील मतदारांनी झाले गेले विसरून गावच्या मतदानाला मात्र हजेरी लावली होती.
संपूर्ण तालुक्यात गाव कारभार यासाठी उत्साहात मतदान पार पडले असले तरी कोणाकडे जाणार हे मात्र उद्याच कळणार आहे.या निवडणुकीत प्रस्थापितांना मात्र मोठी कसोटी करावी लागली.