Instagram lite app : केवळ 2MB साइज असणारे इंस्टाग्राम

 

काही महिन्यांपूर्वी हे ॲप Instagram ने बंद केलेलं होत, हेचं ॲप फेसबुकने काल पुन्हा लॉन्च केलं असून Instagram Lite  आता नव्या रूपात आणखी सुविधांसह पुन्हा उपलब्ध झालं आहे. अधिक फोन्सवर युजर्सना इंस्टाग्रामचा अनुभव घेता यावा हा उद्देश आहे. याची साईझ केवळ 2MB असणार आहे! यामुळे हे ॲप स्वस्त फोन्सवरसुद्धा सहज चालू शकेल! Facebook Fuel for India कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली.


या ॲपमध्ये तुम्ही फोटो, व्हिडीओ अपलोड करू शकाल. स्टोरीज पाहू शकाल अपलोड करू शकाल. हे ॲप मराठी सह ९ भारतीय भाषांमध्ये (मराठी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, पंजाबी, तामिळ व तेलगू) वापरता येईल!

मात्र इथे तुम्हाला Instagram rils आणि IGTV नसणार आहे.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy