Itech marathi : मोबाईल मधील फोटोज्, व्हिडिओज, SD कार्ड मध्ये कसे घ्याल ?

 

मोबाईल मधील फोटोज्, व्हिडिओज, SD कार्ड मध्ये कसे घ्याल ?

आपल्या फोन मध्ये दररोज कित्येक जण फोटोज्, व्हिडिओज सतत पाठवत असतात. जसे की good morning photos, good night photo, festival photos, whatsaap स्टेटस व्हिडिओ सतत, कोणीतरी पाठवतात, यामध्ये आपले महत्वाची कामे किवा कागदपत्रं ही असू शकतात. त्यामुळे हे सगळे फोटो व्हिडिओ आपण डिलीट करू शकत नाही.
मित्रानो त्यासाठी आपण आपले फोटोज् व्हिडिओज हे तुमच्या SD CARD मध्ये हलवू शकता. तुमचा वेळ वाचेल आणि फोन स्तोरेज ही.

आता ही क्रिया कशी करावी, त्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

  • तुम्हाला जायचं आहे, तुमच्या स्मार्टफोन मधील फाईल मेनेजर मध्ये.
  • आता जायचं आहे. फोन स्टरेज मध्ये, तिथे तुमचे सर्व फोल्डर दिसतील.
  • आता त्या फोल्डर मध्ये जा, ज्या फोल्डर मधील photos , videos तुम्ही मेमरी कार्ड मध्ये घेवू इच्छिता.
  • आता तुम्हाला जे फोटोज् व्हिडिओज मेमरी कार्ड मध्ये घ्याची असतील ते निवडा किंवा सिलेक्ट all करा.
  • आता तीन डॉट उभे (…) वरती क्लिक करा,आणि Move वरती क्लिक करा.
  • आता तुम्हाला sd card हा पर्याय निवडायचा आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला फोटो ठेवायचे आहेत तिथे जा किंवा नवीन फोल्डर करा.
  • आता move here वरती क्लिक करा. तुमचे फोटो व्हिडिओ तिथे सामील होतील.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy