Jobs Pcmc : वैद्यकीय अधिकारी पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर

Pimpri Chinchwad Recruitment : पिंपरी-चिंचवड  (Pimpri Chinchwad) महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातील वैद्यकीय अधिकारी पदांची निवड यादी जाहीर झाली आहे.

यादीतील पदाच्या लागणाऱ्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याबद्दल माहिती आणि प्रतिक्षा यादी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

इच्छुक उमेदवारांनी प्रतिक्षा यादीवर अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २३ एप्रिल २०२३ आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी अभिनामाची गट ब मधील शासन मंजूर असणारी रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्याकामी जाहिरात क्र. १२६५ / २०२१चे अनुषंगाने उमेदवारांच्या ऑनलाईन परिक्षा दिनांक २५/०६/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदावरील उमेदवारांना भरावयाचे पदसंख्येचे अनुषंगाने आरक्षण विचारात ऊन १: ३ या प्रमाणात समान गुण मिळालेल्या सर्व उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकामी दि. ०८/०८/२०२२ रोजी बोलविले होते.

कागदपत्रे पडताळणीकामी उपस्थित असलेल्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र, संगणक अर्हता, क्रिमिलेअर / नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, उमेदवारांचे वय, जाती प्रवर्ग व समांतर आरक्षण इत्यादि विषयक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येत आहे.

यादी डाउनलोड  इथे क्लीक करा 

Join Whatsapp GroupJoin Whatsapp Group

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *