Karjat:तालुक्यात शासनाच्या नियमाचे पालन करीत कडकडीत बंद
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग पाहता राज्य सरकारने वैद्यकीय सेवा , मेडिकल, पेट्रोल पंप व इतर अत्यावश्यक बाबी वगळता शनिवार आणि रविवार दोन दिवस संपूर्ण दुकाने, व्यापार पेठ, भाजीपाला, फळ विक्री, चिकन दुकाने, किराणा दुकाने, व इतर दुकाने बंद असल्यामुळे कर्जत सह राशीन मध्ये व तालुक्यात शासनाच्या नियमाचे पालन करीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
कर्जत शहरात सर्वत्र बंद असल्याने रस्ते सामसूम दिसत आहेत, काही काळ नगर पंचायतचे कर्मचारी कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते तर ते पोलिसांनी ही तालुक्यात विविध ठिकाणी लक्ष ठेवले.
रस्त्यावर मास्क न लावता फिरणाऱ्यावर तसेच विनाकारण फिरणाऱ्या वर ग्रामपंचायत राशिन च्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. ग्राम विकास अधिकारी कैलास तरटे, दादा शिंदे, विनोद आढाव, दया आढाव, या पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. याबरोबर पोलीस प्रशासन देखील सतर्क राहताना दिसत आहे. यामुळे सर्व नागरिकांनी शासनाच्या दिलेल्या नियमाचे पालन करीत व मास्क, सॅनिटायझर,चा वापर करावा सोशल डिस्टन्स चे नियम पाळावेत याशिवाय शनिवार रविवार जाहीर केले करण्यात आलेली संचारबंदीचे पालन करावे, घरातच रहावे, विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन पोलिसांच्या वतिने करण्यात येत आहे. संचारबंदी लागू आहे यामुळे घराबाहेर फिरणाऱ्यावर पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते असा इशारा राशीन दूरक्षेत्रचे एपीआय भगवान शिरसाठ यांनी दिला आहे.