Karjat:शहरातील दिवसा चालू असलेले पथदिवे बंद का होत नाहीत -अमोल क्षिरसागर
* कर्जत शहरातील दिवसा चालू असलेले पथदिवे बंद का होत नाहीत -अमोल क्षिरसागर
कर्जत मधे बरेच दिवस झाले शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये पथदिवे दिवस भर सुरूच असतात. बऱ्याच ठिकाणी पथदिवे बंद करण्यासाठी यंत्रणा आहेत तरी सुद्धा रात्री सुरू केलेले पथदिवे सकाळी नियमितपणे बंद केले जात नाहीत. त्यामुळे विजेचा अपव्यय होतो. आणि त्याने अधिकचे बिल नागरिकांकडून आकारले जाते. ही बाब चुकीची आहे ! 15 दिवस झाले मी निवेदन कर्जत नगर पंचायत मधे देऊन तरी सुधा परिस्थिती जैसे थे आहे.
तरीच एक सुजाण नागरिक म्हणून माझी आपणाकडे पुन्हा विनंती आहे की आपण याच्या लक्ष घालून हे दिवसा चालू असणारे पथदिवे त्वरित बंद करण्यासाठी यंत्रणा नेमावी ! आपण मला एका आठवड्या मध्ये कार्यवाही करतो सांगितले होते तरी सुद्धा कसलीच भूमिका आपण घेताना दिसत नाही. येणाऱ्या काळात या कारणासाठी आंदोलन करण्याची वेळ येऊन देऊ नये.असे सांगण्यात आले.