Karjat :आ.रोहीत पवार यांच्या माध्यमातुन कर्जत मधे विकास कामांना जोर
![]() |
Karjat |
कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार रोहित पवार यांनी कर्जत व परिसरात जोरदार विकास कामांचा धडाका लावला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार यांनी दिली यावेळी बोलताना शेलार म्हणाले की कर्जत नगरपंचायतची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदार रोहित पवारांसह सर्वच नेते कामाला लागले असून याचाच भाग म्हणून कर्जत नगरपंचायत हद्दीत आमदार पवार यांच्या माध्यमातून नगर विकास योजनेअंतर्गत तब्बल १९ कोटी रुपयांची विकासकामे सुरू असुन यात प्रामुख्याने अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, कॉंक्रीट रस्ते, तसेच डांबरी रस्ते आणि ठीक ठिकाणी हाय मॅक्स दिवे बसवले जात असून ही सर्व कामे दर्जेदार व मजबूत व्हावेत यासाठी स्वतः आमदार पवार लक्ष देत आहेत. तसेच कर्जत शहरातील सर्व शासकीय इमारतींना रंगरंगोटी करण्याचे काम देखील सुरू असल्याने सर्व शासकीय कार्यालयांनी कात टाकल्या सारखे दिसत आहे. तसेच कर्जत शहरातील पाण्याच्या टाक्या व शहरातील उंच इमारतींवर महापुरुषांचे चित्र रेखाटण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, अहिल्यादेवी होळकर, डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम, महात्मा गांधी तसेच कर्मवीर भाऊराव पाटील व इतर महापुरुषांचे नेत्रदीपक असे चित्र काढण्याचे काम प्रगतीपथावर असून कर्जत येथील दोन्ही नद्यांचे शुद्धीकरण व शुशोभिकरण करून वृक्षलागवडीचे काम करण्यात येत आहे. यामुळे या भागात लोकांना फिरण्यास वाव मिळणार आहे तसेच कर्जत परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या टाकोबा चारीचे चे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होऊन त्यात चारित पाणी सोडले जाईल. आणि विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत तालुक्याचे ग्रामदैवत असलेले श्री संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या रथयात्रेची (रथाची) प्रतिकृती तयार करून कर्जत येथील बसस्थानकावर स्थापन करून कर्जतच्या वैभवात नवीन भर टाकली आहे. तसेच येत्या काही दिवसात कर्जतच्या ठोस विकासासाठी अनेक विकास कामे करण्यात येणार असल्याची माहिती सुनील शेलार यांनी दिली.