Karjat : ऑनलाईन मोबाईल गेमच्या साहाय्याने अल्पवयीन मुलीस पळवले The minor girl was kidnapped with the help of online games

 ऑन लाईन मोबाईल गेमच्या साहाय्याने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून  घेऊन जाणाऱ्या मुलास कर्जत पोलिसांकडून विदर्भातील बाळापूर, जिल्हा अकोले येथून अटक..

Karjat


3 दिवसात पीडित मुलीची सुटका..

पालकांनी लक्ष देण्याची गरज..

कर्जत पोलिसांची कामगिरी

दि. 20.3.2021 रोजी अचानक घरातून वयाने अगदी लहान (14 वर्षे) असलेली मुलगी घरात नसलेबाबत आई-वडिलांच्या लक्षात आले. परिसरात शोध घेतला मिळून आली नाही.

कर्जत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. कर्जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी जवान गणेश ठोंबरे, तुळशीदास सातपुते असा पूर्ण वेळ स्टाफ तपासकामी नेमला. घटनास्थळावरून अपेक्षित माहिती मिळात नव्हती. काही मुलं आणि मुली ऑनलाइन फ्री फायर (free fire) गेम खेळत होती. त्यामधून पोलिसांनी काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि गोपनीय आणि तांत्रिक माहिती वरून बाळापूर, जिल्हा-अकोला येथे सदर पीडित मुलगी असू शकते अशी माहिती मिळाली. तात्काळ सदर ठिकाणसाठी पोलीस अधिकारी आणि जवान याना रवाना केले. रात्री 03.30 वाजता दरम्यान आरोपी नाव मिथुन पुंडलिक दामोदर, वय 24 वर्ष रा . सगद ता . बाळापुर जि. अकोला याचे घरून मुलीला आणि आरोपीस ताब्यात घेऊन कर्जत येथे आणले गेले. 

हे पण वाचा – होळीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

आरोपीने दिली खोटी माहिती-

तपासात आरोपीला मुलीचे नातेवाईक यांना पोलिसांनी त्यांचे समक्ष फोन करून माहिती विचारली असता माझे लग्न ठरले आहे, साखरपुडा झाला आहे. अशी माहिती देऊन दिशाभूल करण्याच्या उद्देशाने दुसऱ्याच मुलीसोबत तयार केलेला बनावट फोटो पाठवून दिला.

हे पण वाचा – होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

अधिक तपास करता माहिती मिळाली की

फ्री फायर आरोपी मुलाशी प्रथम मुलीच्या भावाशी ऑनलाइन ओळख झाली. त्याला 3000 रु चा गेम रिचार्जे केला. तो त्या मुलांसोबत खेळू लागला. काही दिवसात मुलाच्या बहिणीबरोबर सुद्धा फ्री फायर ही गेम खेळू लागला. मुलीशी जास्त बोलणं सुरू झालं. गेम मधेच बोलणं, मेसेज सुरू होत. मुलगी वयाने अतिशय लहान असल्याने तिच्या लक्षात आलं नाही आणि फूस लावून पळवून न्हेले.

कर्जत पोलिसांचे कौतुक..

कोणताही पुरावा नसताना कर्जत पोलिसांनी 3 दिवसातच 650 km वर असलेल्या मुलीला शोधून आणल्याने कर्जत पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

सदर ची कारवाई-

मा. पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील सो,

मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल सो,

उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव, 

यांचे मार्गदर्शनाखाली 

पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव,

उपनिरीक्षक श्री भगवान शिरसाठ

राशीन पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस अंमलदार … तुळसीदास सातपुते, गणेश ठोंबरे, मोबाईल सेलचे नितीन शिंदे, मारुती काळे, सागर म्हेत्रे, बळीराम काकडे, गणेश भागडे, संपत शिंदे

यांनी केली .

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy