Karjat: कर्जत पोलिसांच्या नव्या वसाहती त्यांच्या घराचे स्वप्न आज पूर्ण झाले !
कर्जत ता.४:सर्वांगीण विकासासाठी आघाडी सरकार भक्कमपणे पाठीशी उभे राहील, आमदार रोहित पवार हे दूरदृष्टी चे नेतृत्व असून त्यांच्या पाठ पुराव्यातून कर्जत जामखेड मध्ये अद्ययावत अशी पोलीस निवासस्थाने उभारली जात आहेत.आपली निवड सार्थ असून येथे विकासाचे पर्व सुरू झाले आहे
असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. ते येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार,पोलीस अधीक्षक मनोज पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी,उपजिल्हाध्यक्ष प्रवीण घुले,समिती सभापती , सभापती अश्विनी कांनगुडे, पोलीस गृहनिर्माणच्या दीपाली भाईक, प्रांताधिकारी अर्चना नष्टे,बळीराम यादव,दीपक शहाणे , पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, बारामती ऍग्रोचे राजेंद्र पवार,पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आदी उपस्थित होते.
ते म्हणाले महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वात प्रथम पोलिसांच्या घराची अवस्था सुधारली पाहिजे यासाठी स्वता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारच्या अर्थ संकल्पात पोलीस विभागासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील सहकार्य मिळाले आहे. पोलीस प्रशासनास चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोरोना काळात कर्तव्य करीत असताना कामाचा अतिरिक्त ताण पोलिसांवर पडत असल्याने अनेक जण शहीद झाले. यासाठी लवकरच मोठी पोलीस भरती सुरू करण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू आहे. पोलीस विभागांला चांगली आणि सुसज्ज वाहने उपलब्ध करण्यात आली आहे. आ रोहित पवार यांच्याकडे कर्जत जामखेड मतदारससंघासाठी दूरदृष्टी आहे. मतदारसंघासाठी काम कसे करायचे हे आ पवार यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले तालुक्याच्या विकासकामांत अधिकाऱ्या चे योगदान महत्वपूर्ण असते.या मुळे प्रश्न मार्गी लागत विकासाला चालना मिळते. त्याच पार्श्वभूमीवर आज पोलीस वसाहत भूमिपूजन कार्यक्रम पार पडत आहे. प्रत्येक विभागासाठी वसाहत उभारण्याचा मानस आ पवार यांनी यावेळी व्यक्त केला. तालुक्याच्या विकासासाठी लोकांनी आपल्याला निवडून देण्याचे काम केले आहे त्याच आशीर्वादावर कर्जत जामखेड मतदारसंघाचा विकास करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. जिल्हा पोलिस दलासाठी आगामी काळात २० वाहने महाराष्ट्र राज्य सरकारने उपलब्ध केली आहेत. महिलांसाठी भरोसा सेल मतदारसंघात स्थापन करून भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी नागरिकांनीदेखील पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आ रोहित पवार यांनी केले. कर्जत जामखेडसाठी सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध करण्याची मागणी ना शंभूराज देसाई यांच्याकडे करण्यात आली. सिद्धटेक येथील पोलीस दुरक्षेत्र प्रश्न मार्गी लागेल
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, आजचा दिवस पोलीस कुटुंबियांसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यांच्या घराचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. दोन पोलीस अधिकारी आणि ३६ पोलीस कर्मचाऱ्यासाठी निवासस्थाने साकार होणार आहे. आभार पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी मानले
कर्जत-येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे निवासस्थान भूमिपूजन कोनशीला अनावरण प्रसंगी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई,आ रोहित पवार, पोलीस अधीक्षक मनोज पाटील,राजेंद्र दळवी,अश्विनी कांनगुडे,प्रवीण घुले,काकासाहेब तापकीर,दीपक शहाणे,बळीराम यादव ,किरण पाटील