karjat : कुकडी च्या पाण्याच्या भरोशावर शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन केले होते. हे नियोजन कोलमडले आहे.
कुकडीला पाणी नाही, विहीरी आटल्या, बोअर बंद पडले, यामुळे सुकलेल्या फळबागा, जळत चाललेली पिके, कोरडे पडलेले तलाव व बंधारे, आणि उनाने तप्त झालेला कुकडीचा कॅनाॅल पहात बसण्याची वेळ एवढी भयानक अवस्था कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. कुकडीच्या लाभक्षेत्रात पाण्याचे टँकर कधी सुरू होणार याची वाट कर्जत तालुक्यातील जनता पहात आहे. गेल्या दोन वर्षांपासून कर्जत तालुक्यातील कुकडीचे आवर्तनाचे गणित बिघडल्यामुळे हे झाले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कर्जत तालुक्यातील सुमारे तीस हजार हेक्टर क्षेत्र कुकडी मुळे सिंचनाखाली येते. कुकडीच्या पाण्याच्या भरोशावर कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन केले होते. पण गेल्या दोन वर्षांपासून कुकडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पहावी लागत आहे. गेल्या वर्षी देखील कुकडीचे पाणी मिळावे यासाठी माजी मंत्री राम शिंदे व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कर्जत तहसीलदार कार्यालयापुढे उपोषण केले होते. यावर्षी तर कुकडीच्या पाण्याने कळसच केला आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात कुकडीच्या अंतर्गत असलेल्या धरण क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला होता. असे असताना देखील कर्जतकरांना पुर्वी प्रमाणे ओव्हर फ्लोचे पाणी मिळाले नाही. शिवाय कुकडीचे आवर्तन मंजुरी प्रमाणे सुटले नाहीत. मग कर्जत साठी मंजूर असलेले कुकडीचे पाणी गेले कोठे हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. कर्जत करांच्या हक्काचे पाणी का मिळाले नाही. कुकडीचे कर्जत करांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी गेल्या निवडणुकीत घोषणा केलेले आमदार रोहित पवार यांनी याबाबत काहीच स्पष्ट केले नाही. आज कुकडीच्या धरणात तर फक्त मृत साठा शिल्लक आहे मग कुकडीतील पाणी गेले कोठे हा प्रश्न कर्जत करांना पडला आहे. कुकडीच्या पाण्याच्या भरोशावर शेतकऱ्