Karjat : कोरोना काळात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या ॲम्बुलन्स चालकांना काढले रूम बाहेर During the Corona epidemic, 108 drivers were taken out of the room by Dr. Avsare
![]() |
उपजिल्हा रुग्णालय कर्जत |
कर्जत / सुभाष माळवे
कर्जत येथील उपजिल्हा रूग्णालयात कोव्हीड सेंटर केल्याने 108 अॅबुलस राशीन व कर्जत या दोन्ही गाड्या लोकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम करत आहेत. या गाड्या वरील चालक यांना विश्रांती साठी उपजिल्हा रूग्णालयात अनेक दिवसांपासून एक रूम देण्यात आली होती. या रूम वरती चालक आपला जेवणाचा डबा व विश्रांती साठी लागणारे साहित्य ठेवत असत.
हे पण वाचा.
चालकांना देण्यात आलेले कोरोना कीट घरी जाताना तिथेच ठेवत होते परंतु येथील उपजिल्हा रूग्णालय चे अधिक्षक डाॅआवसरे यांनी कोणतीही पुर्ण सुचना न देता बळजबरीने ही रूम खाली करून घेतली आहे ही रूम खाली करून घेतना आवसरे यांनी तुम्ही कुठेही राह मला मात्र रूम खाली पाहिजे. या चालकांनी रूम खाली करून दिली असून ते सध्या मोकळया पटांगणात वास्तव्य करून कोरोना महामारी च्या कठीण प्रसंगात आपली सेवा इमानदारीने निभावत आहेत. या चालकांची दखल गेल्या पाच सहा दिवसापासून कोणीही घेतली नाही. त्यामुळे येथील एका चालकाने काम सोडून गेला आहे. त्यामुळे येथील उपजिल्हा रूग्णालयात सध्या एका चालकावर भार पडला आहे तर हा चालकही पळून जाण्याचा मनस्थितीत आहे. तरी सिव्हिल सर्जन, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसिलदार नानासाहेब आगळे व गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी वेळी च दखल घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा कर्जत तालुक्यात कोरोना याने बळी जाण्याचा धोका वाढला आहे.
हे पण वाचा इथे करा कोरोना लस नोंदणी
कर्जत तालुक्यात 108 अॅबुलस चे काम अतिशय चांगले असून गोरगरिबांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. एका काॅलवर ही अॅबुलस उपलब्ध होते. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. जर या अॅबुलस च्या चालकांनाच स्वतः चा जीव कसा वाचवायचा हे कळेनासे झाले आहे ते काय गरीब व गरजवंत रूग्णांना मदत करणार.