Karjat :कोरोना पेशंट फिरतात रस्त्यावर,कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
कोरोना positive असताना सुद्धा शहरात फिरणाऱ्या 2 इस्मानवर ..
कर्जत प्रतिनिधी – कर्जत पोलीस स्टेशन आणि नगरपंचायत यांची संयुक्त कारवाई..
पोलीस जवान मनोज लातूरकर यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल..
आरोपी पेशंट याना तात्काळ रुग्णवाहिका बोलावून कोविड केअर सेन्टर, गायकरवाडी येथे दाखल केले.*l
दिनांक- 11/04/2021 रोजी पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, नगरपरिषद मुख्याधिकारी गोविंद जाधव, सपोनि सुरेश माने, नगरपंचायत स्टाफ राकेश गदादे, विलास शिंदे तसेच पोलीस जवान गाडे, बळीराम काकडे, नितीन नरोटे, मनोज लातूरकर असे कर्जत शहरात कोरणा विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणे व सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणार्या लोकांवर कारवाई करणे कामी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी कर्जत शहरात दुपारी 1.00 वा सुमारास 1)दत्ता बापू ढेगळे, राहणार भांडेवाडी, तालुका कर्जत हे दोघे covid-19 पॉझिटिव्ह असताना देखील आपल्या मुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, याची जाणीव असताना देखील सार्वजनिक ठिकाणी विनाकारण विना मास्क फिरताना मिळून आले आहे.
तसेच दिनांक 9.4.2021 रोजी दुपारी इसम नामे 2) श्याम सतीश पवार, राहणार बुवासाहेब नगर, कर्जत, तालुका कर्जत हे काळदाते कॉम्प्लेक्स जवळच्या किराणा दुकानात किराणा साहित्य घेताना मिळून आले.
म्हणून त्यांच्यावर पोका/ मनोज लातूरकर यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 188, 269, 270 व साथरोग अधिनियम कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक यादव आणि मुख्याधिकारी जाधव यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही कोविड केअर सेन्टर येथे दाखल केले.
कर्जत पोलीस आणि नगरपंचायत यांची संयुक्त कारवाई..
यापुढेही असे निदर्शनास आल्यास समबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल..