Karjat चे पोलिस निरीक्षक ‘ पोलिस महासंचालक सन्मान चिन्हाने’ सन्मानित

      कर्जत येथे कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक चंद्रशेखर मोहनराव यादव यांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्हाने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नगर येथील पोलिस मुख्यालय परेड ग्राऊंडवर ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पोलिस अधिक्षक मनोज पाटील व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला.यादव यांनी आत्तापर्यंत दरोड्याची ३०,जबरी चोरीचे ४९, घरफोडीचे ६८,चोरीचे १७१ गुन्हे उघडकीस आणुन दरोडेखोरांच्या अनेक टोळ्यांना जेरबंद केले आहे.याशिवाय अवैध धंद्यांच्या विरोधात त्यांनी मोठी मोहीम राबवुन लाखो रुपयांच्या दंडात्मक कारवाया करत वाळूतस्करांवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.दारू,जुगार,मटका,वेश्या व्यवसाय,गुटखा, अशा व्यावसायिकांवर ठोस कारवाया केल्या आहेत. सन २००६ पासुन त्यांनी वर्धा-सेवाग्राम, वर्धा शहर पोलिस स्टेशन,स्थानिक गुन्हे शाखा वर्धा,पुणे ग्रामीण-बावडा पोलिस दुरक्षेत्र, इंदापूर पोलिस स्टेशन, भिगवण पोलिस स्टेशन, बारामती अपर पोलिस अधिक्षक कार्यालय आदी ठिकाणी उल्लेखनीय काम केले. बारामती गुन्हे शोध पथक मोहिमेत त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीमुळे पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाने यापुर्वीही सन्मानित करण्यात आले.पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापुर,शिरूर, शिक्रापूर, जेजुरी आदी ठिकाणी खुन,दरोडे,जबरी चोऱ्या आदी गुन्ह्यातील गुन्हेगारांना जेरबंद करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी काम केले आहे तेथे त्यांचा शिस्तप्रिय सिंघम अधिकारी म्हणुन दरारा आहे. कर्जत येथील पोलिस स्टेशनला पदभार स्विकारल्यापासुन कर्जत शहरासह तालुक्यातील गावांमध्येही त्यांनी शिस्तीचे दर्शन घडवले आहे.कर्जतच्या बेशिस्त वाहनचालकांना त्यांनी लावलेल्या शिस्तीचे विशेष कौतुक होते.पोलिस ठाण्यातही त्यांनी लावलेल्या शिस्तीची चर्चा आहे.यापुर्वी कर्जतच्या पोलिस ठाण्यात परस्परविरोधी दाखल करण्यात येणाऱ्या गुन्ह्यांनाही आता चाफ बसला आहे. त्यामुळे खोट्या गुन्ह्यांना आळा बसला असुन सर्वसामान्य नागरिकांना प्रामाणिक न्याय मिळत आहे.गुन्हे दाखल करून घेण्यासाठी वापरण्यात येणारे दबावतंत्र,राजकीय अट्टाहास,आरोपी तसेच तक्रारदारामध्ये दलाली करणाऱ्यांनाही घरचा रस्ता दाखवण्यात येत असल्याने सिंघम अधिकारी म्हणुन चंद्रशेखर यादव हे कायम चर्चेत आहेत.त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
छाया:कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नगर येथे सन्मानित करण्यात आले.
You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy