सेवेकरी ने उचलला कर्जत स्वच्छ करण्याचा विडा
कर्जत सेवेकरी ग्रुप ने कर्जत शहर स्वच्छता अभियानाचा विडा उचलला आहे . नगरपंचायत चे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत , मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या पुढाकाराने कर्जत शहरातील अनेक भागात जमा झालेला कचरा व इतर टाकाऊ पदार्थ संकलित करण्यात आले . ‘ कर्जत शहर , स्वच्छ शहर ‘ ही संकल्पना साकारण्यासाठी आम्ही कर्जत चे सेवेकरी यांनी व नगरपंचायत ने स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे . शहराची ओळख ही स्वच्छतेवर अवलंबून असते . प्रथम दर्शनी येणाऱ्याला रस्ते , नाल्या स्वच्छ दिसल्या तर समाधान व्यक्त केले जाते . जागोजागी साचलेला कचरा , सर्वत्र घाणीचे साम्राज्य , उग्र वास , सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था यामळे विविध आजाराचा सामना करावा लागत ो
आजाराला रोखण्यासाठी स्वच्छता राखणे ही काळाची गरज आहे . यासाठी आम्ही कर्जत चे सेवेकरी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून रोज श्रमदान करत कर्जत शहरात स्वच्छता करण्याचे काम चालू आहे. वास्तविक पाहता प्रत्येक व्यक्ती ने
आपल्या घरासमोरील व परिसरात स्वच्छता करण्याचे पाऊल उचलणे गरजेचे आहे .
कर्जत शहरातील नागरिकांना स्वच्छता चे महत्त्व पटवून देणे व आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम ही आम्ही कर्जत चे सेवेकरी करत असून त्यांना लोकांचा प्रतिसाद ही मिळत आहे.
कर्जत नगरपंचायत
आम्ही कर्जत चे सेवेकरी यांच्या वतीने कर्जत शहराबरोबरच परिसरात स्वच्छता चे महत्त्व पटवून देण्यासाठी
जनजागरण रथ बनवून त्याद्वारे समक्ष जाऊन व्यक्तींना प्रबोधन करण्याचे काम आम्ही कर्जतचे सेवेकरी यांचे वतीने केले जात आहे त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी स्वच्छता केली त्या ठिकाणी वेगवेगळे मार्गदर्शक फ्लेक्स बोर्ड तसेच भिंतीवरती स्लोगन झाडांना तिरंगा कलर तसेच भिंतीवरती हस्ता अक्षरांमध्ये स्वच्छ कर्जत सुंदर कर्जत अशा प्रकारचे वाक्य, टाकाऊ टायर मधून सेल्फी पॉइंट तसेच कर्जत शहरात प्रवेश करणाऱ्या राशीन रोड आकाबाई नगर जवळील फुलाला रंगकाम करण्यात येत आहे तसेच कोरेगाव वरून कर्ज त शहरात प्रवेश करणाऱ्या अण्णाभाऊ साठे नगर जवळील फुलालाही रंगकाम करण्यात येणार आहे
नामदेव राऊत
आम्ही कर्जत चे सेवेकरी