Karjat छत्तीसगडच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून आणणाऱ्या मुलास राशीन येथे अटक

कर्जत प्रतिनिधी दिलीप अनारसे

छत्तीसगड जिल्हा जसपुर मधील कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील तारीख 10/11 /2020 रोजी दाखल गुन्हा 227/2020 भादवि कलम 363 मधील मुलगी 17 वर्ष हिस फूस लावून मुलगा अतुल सिंग कमलेश सिंग चव्हाण वय 19 वर्ष याने नोव्हेंबर महिन्यात नागपूर येथून कर्जत येथे आणले होते. सदर मुलीचा शोध घेणे कामी छत्तीसगड येथील जसपुर जिल्ह्यातील कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरणेश्वर प्रताप सिंह व त्यांचा स्टाफ पोलीस जवान व महिला पोलीस हे कर्जत पोलीस स्टेशन येथे आले होते.

 सदर गुन्ह्यातील आरोपी आणि अपहत मुलीची माहिती गेले 2 दिवस झाले कर्जत पोलीस कर्जत शहरात आणि परिसरात शोध घेत होते.

 गोपनीय माहिती वरून राशीन येथे सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले.  त्यानंतर अपहत मुलीला ताब्यात घेण्यात आले.

 कर्जत पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीस व मुलीस छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरच्या कारवाईने छत्तीसगड पोलिसांनी श्री चंद्रशेखर यादव साहेब व स्टाफ यांचे अभिनंदन केले आहे .

सदर ची कारवाई 

उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान शिरसाठ

राशीन पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस अंमलदार .. गणेश ठोंबरे, मनोज लातुरकर, बळीराम काकडे

यांनी केली .

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy