Karjat: तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना बाधित रुग्णांना फळांचे वाटप
कर्जत प्रतिनिधी – दिलीप अनारसे .कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे मित्र परिवाराच्या वतीने कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त फळांचे वाटप करण्यात आले. तसेच येथील वैद्यकीय डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना ( हॅन्ड ग्लोज) हात मोजे आणि मास्कचे वाटप करण्यात आले. शिंदे कुटुंबीय व मित्रपरिवार नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून यात नागेश्वर मंदिराच्या परिसरात वृक्षलागवड करुन त्या झाडांना कायम पाणी घालून झाडे वाढवले. तसेच संतोष शिंदे यांनी तयार केलेल्या तेलाच्या डब्यांपासून झाडांवर पक्ष्यांसाठी पाण्याची व चाऱ्याची केलेली सोय हे सामाजिक भावनेतून केलेला उपक्रम आहे. याचाच एक भाग म्हणून आज पत्रकार मोतीराम शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरणा बाधित रुग्णांना सफरचंद व केळींंचे वाटप करण्यात आले. यावेळी शिंदे परिवारातील संतोष शिंदे , अविनाश शिंदे, भाजपा मागासवर्गीय मोर्चाचे प्रदेश सदस्य गणेश शिंदे , पत्रकार आकाश कटके , भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राजेंद्र येवले , ओंकार शिंदे , तसेच उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. सचिन डफळ , डॉ. शबीना शेख , श्रीमती रोहिणी कडूस , अलका लोखंडे , अर्चना जाधव, मारुती जाधव , मुजफ्फर सय्यद , किरण समुद्र, आदी उपस्थित होते. या चांगल्या उपक्रमा बदल डाॅक्टर व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.