Karjat :तालुक्यातील ग्रामसेवक,आशा सेविका,अंगणवाडी सेविका, यांचा covid योद्धा म्हणून गौरव
‘विविध विभागातील कोरोना योध्यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. मात्र संकट अजुनही टळलेले नाही.पुढील काळातही सर्वांनी काळजी घ्यावी, आपले आरोग्य सांभाळावे,मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करावा,नियमित आहार आणि स्वच्छतेवरही लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आ.रोहित पवार यांच्या मातोश्री तथा बारामती ऍग्री कल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.
कर्जत येथे घेण्यात आलेल्या ‘कोव्हिड योद्धा सन्मान सोहळ्यात’ त्या बोलत होत्या.कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामसेवक,आशा सेविका,अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तक, ग्रामरोजगार,पंचायत समिती व पशु संवर्धन या ६ विभागातील सुमारे ८५१ कोव्हिड योद्धांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन नुकताच सन्मान करण्यात आला.यावेळी पोलिस उपअधिक्षक आण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गटविकास अधिकारी अमोल जाधव तसेच विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यावेळी सुनंदा पवार पुढे म्हणाल्या,’सर्वांनी कोरोना काळात केलेल्या व सध्याही अविरतपणे सुरू असलेल्या कामाचा गौरव करणे ही आपली नैतिक जबाबदारी जाणून त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणुन हा उपक्रम हाती घेतला आहे.
खेड येथील ग्राम रोजगार म्हणून कार्यरत असणारे प्रशांत आगवण यांचा सन्मान सुनंदा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रशांत आगवण यांनी ग्राम रोजगार म्हणून खेड गावात अतिशय प्रमाणीक काम करून दीनदुबळ्या ची सेवा केली आहे या शिवाय कोरोना काळात ही त्यांनी ऊत्कृष्ट काम करून खेड गावात नावलौकिक मिळवला होता त्याचा सन्मान झाल्याने खेड गावात तून आनंद व्यक्त करण्यात आला तर जनतेची सेवा करणा-या व्यक्तीचा सन्मान झाला आहे अशा प्रतिक्रिया खेड गावातून उमटल्या.