Karjat: तालुक्यात कोरोना चा थैमान मृत्यू प्रमाणात वाढ प्रशासनाचे दुर्लक्ष

कर्जत / सुभाष माळवे  : कर्जत शहर आणि तालुक्यात वाढत्या कोरोनाच्या संख्येने सर्वसामान्य नागरिकामध्ये भयंकर घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या व्यक्तींना योग्य माहिती अथवा वेळीच उपचार मिळत नसल्याने सध्या कर्जत तालुक्यात मृत्युचे प्रमाण देखील वाढत असल्याची माहिती एका रुग्णाच्या नातेवाईकाने आमच्या प्रतिनिधीकडे दिली. याबाबत अधिकारी देखील व्यवस्थित माहिती देत नसल्याची घटना समोर येत आहे.

           कर्जत शहर आणि तालुक्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. दररोज तीन आकडी कोरोनाबाधीत व्यक्ती सापडत असल्याने त्यांच्या उपचारासाठी आणि सुविधेबाबत मोठ्या मर्यादा समोर येत आहे. शनिवारी गायकरवाडी कोव्हीड सेंटर या ठिकाणी कर्जत शहरातील एका नागरिकांचा वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यु झाला असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकाने पत्रकारांना दिली. यासह उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात एका रुग्णवाहिकेत कोरोनाबाधीत व्यक्तीला डॉक्टराशिवाय उपचार न मिळाल्याने आपल्या प्राणास मुकावे लागले असल्याची माहिती पुढे येत आहे. त्या मृताची पत्नी अक्षरशः तिच्या नवऱ्यावर उपचार व्हावे यासाठी गयावया करत असताना तिच्या आक्रोशाकडे कोणी साधे लक्ष देखील दिले नसल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीनी दिली. एकीकडे प्रशासन आपण छान काम करीत असल्याच्या बातम्या पत्रकारांना देत असताना त्यांच्या चुका झाकत आहे. यासह कोणी नातेवाईक अथवा कोरोनाबाधीत याने प्रश्न उपस्थित केल्यास त्या संबंधित व्यक्तीवर दबाव टाकत त्यावर पांघरूण घालण्याचा प्रताप देखील करत असल्याचा आरोप नातेवाईक करीत आहे. याबाबत आधिकार्याकडे अधिक विचारपुस केली असता ते देखील आपली जबाबदारी झटकत हम करे सो कायदा अशा आविर्भावात राहत आहे.  

कोरोन्टाईन करता मग त्यांची जबाबदारी कोणाकडे

        कोरोनाबाधीत अहवाल आल्यावर त्या व्यक्तींना कोव्हीड सेंटरला रवाना करीत कोरोन्टाईन केले जाते. तर गंभीर व्यक्तीवर जिल्हा उपरुग्णालयात उपचार केले जाते. ज्यांना कोरोन्टाईन केले जाते त्यांना मोठ्या अडचणीना सामोरे जावे लागत असल्याची माहिती त्या व्यक्ती आपल्या मित्रपरिवारास देतात. प्रशासना अथवा आरोग्य सेवेच्या अपुऱ्या सुविधेमुळे शनिवारी दोघाना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे प्रशासन फक्त कोरोन्टाईन करून आपली पुढील जबाबदारी झटकत असल्याचे सिद्ध होत आहे. यात मात्र आमच्या माणसांना जीव गमवावा लागतो यांचे त्यांना दुःख नाही. ज्यावेळी यांच्या घरच्या बाबतीत असा प्रकार घडेल त्यावेळी त्यांना आमच्या दुःखाची किंमत कळेल अशी प्रतिक्रिया एका मृत व्यक्तीच्या नातेवाईकाने पत्रकारांना दिली  

 आमदार साहेब कोरोना मृत्युच्या घटना वाढत आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क करा

         मागील आठवड्यापासून कर्जत तालुक्यात कोरोनाने मृत्यु होण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. यामुळे कर्जतच्या आरोग्य यंत्रणेवर काही अंशी प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. लोकप्रतिनिधी असणारे लोक आता कोरोनापासून दूर पळत आहे. तर प्रशासन कोरोन्टाईन करून आपली जबाबदारी पूर्ण करून पेशंटच्या उपचार आणि सुविधेबाबत गाफीलपणा बाळगत आहे. यामुळे कोरोना मृत्युची संख्या वाढत असल्याने आमदार साहेबांनी याकडे लक्ष देणे आवश्यक बनले असून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना अंमलात आणण्याची मागणी पुढे येत आहे.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy