Karjat :दरमहा शंभर कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश देणा-या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा
कर्जत / सुभाष माळवे
दरमहा शंभर कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश देणा-या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा,अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येेईल, असा इशारा आज (दि.२१) तालुका भाजप कार्यकारिणीच्या वतीने निवेदनाद्वारे तहसिलदारांना देण्यात आला आहे.
या मागणीसाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष डाॅ सुनील गावडे , भाजपाचे नेते नामदेव राऊत, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन पोटरे, किसान मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, ओबीसी सेल चे राज्य उपाध्यक्ष विनोद दळवी यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील फाॅरेस्ट चौकात रस्ता रोको व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निषेधार्थ घोषणा देत राजीनामा देण्याची मागणी करत परिसर दणाणून सोडला. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे या पोलीस अधिका-यास दर महिन्याला १०० कोटी रूपये भ्रष्ट मार्गाने गोळा करण्याबाबतचे दिलेले आदेश बेकायदेशीर आहेत.
थोरात डॉ. आत्महत्या खरे कारण 👈👈
पुरोगामी महाराष्ट्राला व राज्याच्या राजकारणाला काळीमा फासणारी ही बाब आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासूनच राज्यात भ्रष्टाचार, हिंसाचार,अत्याचार या मार्ग ने जनतेची सतत लूट करत आहे.जनतेने निवडून दिलेले, जनतेचे रक्षणकर्ते सरकार व मंत्री जर भ्रष्टाचार,अत्याचार करावयास लागले तर सर्वसामान्य जनतेने दाद मागायची कोणाकडे असा सवाल करत राजीनामा द्यावा व जर राजीनामा दिला नाही तर मोठे आंदोलन केले जाईल आसा इशारा ही यावेळी देण्यात आला. यावेळी सरचिटणीस उमेश जेवरे, अनिल गदादे, पप्पू धोदाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.