Karjat : पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा जाधव यांची बिनविरोध निवड
![]() |
Manisha jadhav karjat |
कर्जत पंचायत समिती च्या सभागृहात प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत ही निवड करण्यात आली.
या निवडी वेळी मावळते सभापती अश्विनी कानगुडे, हेमंत मोरे, , राजेंद्र गुंड, साधना कदम, प्रशांत बुध्दीवंत, हजर होते तर बाबासाहे गांगर्डे व
ज्योती शिंदे गैरहजर राहिले. सभापती पदार्थ साठी एकमेव अर्ज मनीषा जाधव यांचा दाखल झाला होता त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी बिनविरोध सभापती म्हणून मनीषा जाधव यांना जाहीर केले. निवडीनंतर राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे हस्ते नुतन सभापती मनीषा जाधव यांचा सत्कार करण्यात आला
.या वेळी ,श्याम कांनगुडे,सुदाम धांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मावळत्या सभापती अश्विनी कांनगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली ही निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करीत गुलालाची उधळण करण्यात आली. या वेळी राजेंद्र फाळके म्हणाले कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली येथील पंचायत समितीची विकास आणि प्रगतीची घोडदौड सुरू राहील.
मनीषा जाधव म्हणाल्या आमदार रोहित पवार यांना दिलेल्या शब्दा प्रमाणे माझ्या सहकारी अश्विनी कांनगुडे यांनी पदाचा राजीनामा दिला.त्या मुळे माझ्या सारख्या सर्वसामान्य गृहिणीला आमदार पवार,राजेंद्र फाळके आणि पती दिलीप जाधव यांच्या मुळेच सभापती पदी काम करण्याची संधी मिळाली तिचे सोने करीत पंचायत समिती राज्यात अववल करू. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोल जाधव यांनी काम पाहिले.