Karjat: बाजारभाव नसल्यामुळे टोमॅटोचा होतोय शेतातच लाल चिखल Tomatoes are getting red mud due to lack of market price
![]() |
टोमॅटो पिकांना बाजारात सध्या एक ते दोन रुपये अशाप्रकारे नीचांकी दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादकांना उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने योग्य दराअभावी शेतातच टोमॅटोचा चिखल झाल्याचे पहावयास मिळत आहे.
अंबिजळगाव (ता.कर्जत) येथील युवा शेतकरी अशोक कुमार पितांबर अनारसे यांनी दोन पैसे होतील या आशेने आपल्या तिन एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली वारंवार बदलणारे हवामानामुळे रोगराई पासून वाचण्यासाठी वारंवार त्याच्यावर औषध फवारणीही केली केली चांगल्या उत्पन्नाच्या आशेवर त्यांनी भला मोठा खर्च केला झाडेही फळांनी लगडली परंतु सध्या मार्केट मध्ये टोमॅटो एक रुपया दोन रुपये किलो याप्रमाणे विकला जात असल्याने,तो मार्केटला माल नेणेही परवडत नाही त्यामुळे त्यांनी संपूर्ण पीक शेतात सोडून दिले शेतात मात्र टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे.गतवर्षी अशाच प्रकारची परिस्थिती कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनमध्ये वाहतुक व मार्केट बंद असल्याने शेतातील तयार माल बाजारात विकता आला नाही त्यावेळीही मोठा आर्थिक फटका बसला होता.
टोमॅटो पाठोपाठ कोबी पिकालाही उतरत्या दराचा सामना करावा लागत असून कोबी पिकाने सध्या नीचांकी दर गाठला असून केवळ एक रुपया दराने कोबीची विक्री होत आहे. वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक कोंडीत सापडला आहे.
त्यातच कोरोनाचे संकट पुन्हा एकदा घोंगावू लागल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन होते की काय ? याच भीतीने शेतकरी मात्र हबकून गेला आहे.
“एक वेगळा प्रयोग म्हणून टोमॅटोची लागवड केली चांगला दर मिळेल अशी आशा होती,त्यामुळे खर्चही केला परंतु सध्या बाजारात टोमॅटोला दरच नसल्याने तो मातीमोल दराने विकावा लागत आहे. या दरात केलेला खर्चही निघणे अवघड झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे टोमॅटो शेतातच सोडून दिले आहेत.”
अशोक अनारसे,शेतकरी,अंबिजळगाव.