Karjat : महामानवाच्या जयंती निम्मिताने रक्तदानाने करा अभिवादन

Blood donation for the anniversary

कर्जत  / सुभाष माळवे  : राज्यामध्ये करोनाचा फार मोठा थैमान आहे.अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत.शासन आपल्या स्तरावार उपाय योजना करीत आहे.रुग्ण संख्या वाढतच असल्यामुळे राज्यात रक्ताचा तुडवडा पडला आहे.शासनाला मदत करण्याकरीता १४ एप्रिल २०२१ ला  क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब यांच्या जयंती निम्मित भास्कर भैलुमे मिञ मंडळ व अभय क्लॉथ यांच्या  संयुक्त  विद्यमाने

 रक्तदान शिबिराचे आयोजन जिप प्राथमिक शाळा कर्जत येथे सकाळी 10  करण्यात आले आहे  तरी आपण सर्वानी क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले व  डॉ.बाबासाहेब आंबेडकर याची जयंती साजरी करून   जास्तीतजास्त संख्येने रक्तदान  करून क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना  अभिवादन करण्याचे आव्हन अभय क्लॉकचे संचालक अभय बोरा यांनी केले आहे .

हे पण वाचा बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा

तसेच सध्या अहमदनगर  जिल्ह्यामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरु आहे. शासनाने प्रतिबंधक उपाय म्हणून अहमदनगर  जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शहरात व गावामध्ये कोविड चाचणी व लसिकरणाचे कॅम्प लावलेले आहे.शासन आपल्या परीने शक्य ती मदत करीत आहे.परंतु अजूनही लोकांमध्ये लसीकरनाबाबद संभ्रम आहे.तरी कोविड ची लस घेण्याकरिता व चाचणी करण्याकरिता जनतेला प्रोत्साहित करने लोकांमध्ये जनजागृती करण्याकरीता

कर्जत तालुक्यातील सर्व भीम सैनिकानी व  कार्यकर्त्यांनी आपापल्या शहर व  ग्राम स्तरावर सहभाग नोंदवावा व जनतेला चाचणी व लस घेण्याकरिता मदत कार्य करावे असे आव्हान सामजिक कार्यकर्ते भास्कर भैलुमे यांनी केले आहे.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy