Karjat News:शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोणा सेंटर ची जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केली पाहणी
![]() |
Karjat news live |
कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना सेंटरची पाहणी केली.*-जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले — कर्जत प्रतिनिधी दिलीप अनारसे : कर्जत शहरातील महात्मा गांधी विद्यालयातील आणि उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथील कोरोना सेंटरची पाहणी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बुधवारी केली. यावेळी पाहणी करत स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र क्षीरसागर, , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे, निवासी औद्योगिक अधिकारी बेलंबे, उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले, प्रांताधिकारी अर्चना नष्टे आदी विभागीय प्रमुख उपस्थित होते
हे पण वाचा : आपल्या कर्जत मधे इतके कोरोणा रुग्ण
मागील महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट पुन्हा सक्रिय झाली असून कर्जत शहर आणि तालुक्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय आणि महात्मा गांधी विद्यालयातील कोव्हिडं सेंटरची पाहणी बुधवारी केली. यावेळी त्यांनी कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागातील अधिकारी – कर्मचाऱ्याशी सवांद साधला. कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाने दिलेले नियम काटेकोरपणे पाळत सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच या काळात गर्दी असणाऱ्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळत प्रशासनाने विहित संख्या स्पष्ट केली आहे त्याची पुरेपूर खबरदारी घेत अनावश्यक गर्दी टाळावे असे म्हंटले. यासह कोरोना नियम मोडणाऱ्या व्यक्ती, मंगल कार्यालये यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सुचना उपस्थित अधिकारी वर्गास करण्यात आले. नागरिकांनी कोरोनाचे लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करीत त्यावर योग्य उपचार घ्यावे. यासह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वता पुढे येत आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे जिल्हाधिकारी भोसले यांनी नागरिकांना आवाहन केले. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ कुंडलिक अवसरे आदी
उपस्थित होते.