Karjat News: कर्जत पंचायत समिती सभापती पदाची निवड ; राष्ट्रवादीच्या मनीषा जाधव यांची लागणार वर्णी
कर्जत पंचायत समिती सभापती पदाच्या निवडीसाठी २६ मार्चला विशेष सभा बोलवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या सभेची नोटीस जारी केली आहे. अश्विनी कानगुडे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे.
पंचायत समिती सभागृहात होणाऱ्या निवडीसाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी पिठासीन अधिकारी म्हणुन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांची नेमणूक केली आहे. पंचायत समितीत राष्ट्रवादीचे बहुमत असून सभापतिपद हे सर्वसामान्य महिलेसाठी राखीव आहे.
राष्ट्रवादीकडून कोरेगाव पंचायत समिती गणाच्या मनीषा दिलीप जाधव या इच्छुक आहेत. त्यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. जाधव कुटुंब हे राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक राहिलेले आहेत. मनीषा जाधव यांचे पती दिलीप जाधव हे दहा वर्षे तर त्यांचे बंधू पाच वर्षे कोरेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य राहिलेले आहेत. गोरगरीब जनतेच्या प्रश्नांसाठी सतत अग्रेसर राहून ते राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार रोहित पवार यांचे कट्टर समर्थक राहिलेले आहेत.