Karjat News: दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचे मनपरिवर्तन घडवून आणण्यासाठी कर्जत पोलिसांनी उपक्रम
दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचे मनपरिवर्तन घडवून आणण्यासाठी कर्जत पोलिसांनी उपक्रम राबविला.
दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचे मनपरिवर्तन घडवून आणण्यासाठी कर्जत पोलिसांनी उपक्रम राबविला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
या उपक्रमात हभप माऊली महाराज पठाडे यांनी आरोपी यांचे मन परिवर्तन करण्यासाठी तसेच त्यांच्या वर्तनात सुधारणा होण्यासाठी व्याख्यान दिले. यावेळी ३२ आरोपी हजर होते. डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांनी उपक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोलीस कर्मचारी पोलीस पाटील उपस्थित होते.