Karjat:_गणेशवाडी येथे ३३ केव्ही विज उपकेंद्राचे लोकार्पण

Rohit pawar
Rohit pawar

       ‘लोकांना विश्वासाने दिलेला शब्द माझ्यासाठी महत्वाचा असतो त्यात कधी बदल होत नसतो. लोकांच्या मागणीनुसार या कामासाठी मी पाठपुरावा केला वरिष्ठ नेत्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आणि हे काम मार्गी लागले. ६ गावांना या उपकेंद्राचा फायदा होईल.खेड,भांबोरा या उपकेंद्रांवर पडणारा अतिरिक्त भारही कमी होईल.आता इथले राजकारण बदलेल आणि विकासाच्या राजकारणाकडे सर्वांचा कल राहील.लोकांच्या हितासाठी जातीय राजकारण नाही तर फक्त विकासाचं राजकारण करायचय असे मत आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले.

       गणेशवाडी (ता.कर्जत)येथे ‘दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत’ कार्यान्वित झालेल्या ३३/११ के.व्ही. विज उपकेंद्रांच्या उद्घाटन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास कायगुडे हे होते.

      यावेळी उपसभापती हेमंत मोरे,कल्याण दातीर, बाबुलाल शेख, लालासाहेब कायगुडे,नामदेव आप्पा कायगुडे,ज्ञानदेव खताळ,शिवाजी ठोंबरे, विजय देवकाते, राम पाडुळे, संतोष मदने,दादा पाडुळे, भिवराज कायगुडे, गणपत कायगुडे, गणेश मराळे,लाला माने, उत्तम कायगुडे, भरत पावणे, किशोर दुरगुडे तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता सुरेश कुऱ्हाडे, उपकार्यकारी अभियंता अशोक घुले, चाचणी विभागाचे रोहण धर्माधिकारी ,राशीन कक्षाचे सहाय्यक अभियंता संदिप जाधव, यंत्रचालक संतोष कांबळे,तंत्रज्ञ गैातम खटके आदी मान्यवर उपस्थित होते .

        आ. रोहित पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी पानंद रस्ते मोहीम हाती घेण्यात आली असुन कर्जतचे ९५ तर जामखेडचे १०० पानंदरस्ते होत आहेत बुडीत बंधाऱ्याचा जिव्हाळ्याचा विषयही मार्गी लागणार असुन भिमा पात्रात सुमारे ४२ कि.मी पर्यंत बॅकवॉटरचा फुगवटा कायम राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये.

    प्रास्ताविकात उपकार्यकारी अभियंता अशोक घुले म्हणाले, दिनदयाल उपाध्याय योजनेत हे काम प्रस्तावित झाले होते मात्र गेली तीन वर्षांपासून हे काम अर्धवट अवस्थेत पडुन होते मात्र आ. रोहित पवारांनी पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले आहे .

   रविंद पाडुळे म्हणाले, वीज आणि रस्ते या दोन्ही गरजा पुर्ण झाल्या असुन शेतकरी हितासाठी हाती घेण्यात आलेल्या बुडीत बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला तर दुष्काळाची झळ पोहोचणार नाही.

  यावेळी विजय कायगुडे, महादेव कायगुडे आदींनीही मनोगते व्यक्त केली.

अनुमोदन विजय कायगुडे यांनी तर आभार रविंद्र पाडुळे यांनी मानले.

अन् रोहित पवार अधिकाऱ्यांवर भडकले

       ‘रोहित्र जोडणीसाठी शेतकऱ्यांकडुन महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याच्या काही तक्रारी माझ्याकडे आल्या हे मला बिलकुल चालणार नाही आणि मी खपवूनही घेणार नाही,शेतकऱ्यांचे फोन वेळेत घ्या, त्यांना सहकार्य करा तेही तुम्हाला सहकार्य करतील नाहीतर माझ्यासारखा विचित्र माणुस कुणी नाही असे म्हणत आ. पवार उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांवर भडकले.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy