Loading Now

Maratha Reservation News Pune : पुणे शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

पुणे शहर मराठी बातम्या .

Maratha Reservation News Pune : पुणे शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

-शहर-मराठी-बातम्या-1-1-300x167 Maratha Reservation News Pune : पुणे शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

Maratha Reservation News Pune  : पुणे शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

पुणे, २१ डिसेंबर २०२३: पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयाने पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक २६/१२/२०२३ रोजी ००.०१ वा. पासून ते दिनांक ०८/०१/२०२४ रोजी २४.०० वा पर्यंत १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार, पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात खालील कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे:

  • कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे.
  • दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.
  • शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.
  • कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढा-यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.
  • मोठयाने अर्वाच्च घोषणा देणे, सार्वजनीक टिकाकरण उच्चार गाणी गाणे, वाद्य वाजविणे.
  • पुणे शहरात तैनात असलेल्या कोणत्याही पोलीस अधिका-याच्या मते, शालीनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारे चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तु किंवा वस्तु तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारीत करणे जेणे करुन सार्वजनिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथुन टाकणेस कारणीभुत ठरु शकेल.
  • यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालीत आहे.
  • ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) विरुध्द वर्तन करणे.

या आदेशानुसार, पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणुक काढण्यास पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे पुर्व परवानगी शिवाय बंदी घालण्यात आली आहे.

हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या परिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. हा आदेश खाजगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार इत्यादींना लागू होणार नाही, जे ३ १/२ फूट पर्यंत लांबीपर्यंतच्या लाठया बाळगत आहेत.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

ad

Post Comment