कर्जत ता.९:कोरोना हद्दपार करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यात ग्रामपंचायती चे पदाधिकारी ही पुढे येत आहेत. तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामस्थांची मोफत कोरोना तपासणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे कुठल्याही निधीची अपेक्षा न करता सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी स्वखर्चाने तपासणी किट खरेदी करून तीनशे ग्रामस्थांची तपासणी केली तीत एक्कावन्न जण बाधित आढळले आहेत.आशा प्रकारचा स्वखर्चातून उपक्रम राबविणारी टाकळी खंडेश्वरी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना महामारी चा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे त्या मुळे लक्षणे दिसताच कोरोना तपासणी करून घ्या असे प्रशासनाच्या वतीने आवाहन केले जात आहे मात्र मोजक्याच तपासणी किट येत असल्याने तपासणी करायला गेलेल्या ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागून मनस्ताप व्हायचा तसेच गावातील कोरोना बाधित व लक्षणे असणारांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली होती.या मुळे सर्व नियम पाळीत असणाऱ्या मंडळींची पाचावर धारण बसली होती.
त्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.किरण पाटील आणि नूतन सरपंच डॉ सागर कुमार ढोबे यांनी पुढाकार घेत शासकीय मदतीची अपेक्षा न करता सर्व ग्रामपंचायत सदस्यांना समवेत घेत स्व खर्चातून गावातच कोरोना तपासणी केली तर.त्यास सर्वांनी संमती दिली आणि स्वतः सरपंच डाॅ. ढोबे,उपसरपंच श्रीमती सौ.मंगल पवार,ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील ,काकासाहेब सकट ,ज्ञानेश्वर डूबल,
श्रीमती रोहिणी फरताडे
श्रीमती जाईबाई तांबे
श्रीमती फौमिदा सय्यद,
श्रीमती मंगल भालेराव यांनी वर्गणी करून कोरोना तपासणी किट खरेदी करून गावातील लोकांच्या तपासण्या केल्या. या कामी गटविकास अधिकारी अमोल जाधव,तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांचे मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ नीलिमा भवर
ग्रामसेविका प्रतिभा मांडे आरोग्य सेवक विठ्ठल खेडकर यांचे सहकार्य लाभले.
इन्फोसाठी,,,,,
१)कोरोना बाबत जनजागृती करीत टाकळी खंडेश्वरी येथील ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्यांनी एकत्र येत स्वखर्चाने ग्रामस्थांची मोफत कोरोना तपासणी केली आहे.या बाबत त्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.याचा आदर्श इतरांनी घ्यावा-अमोल जाधव,गट विकास अधिकारी, कर्जत
२)टाकळी खंडेश्वरी हे कर्जत जामखेड रस्त्यावरील गाव आहे मात्र परिसरातील अनेक गावांचा संपर्क आहे,तसेच गावात कोरोना बाधित आणि त्यांच्या संपर्कातील लक्षणे असलेली संख्या वाढत होती.त्या मुळे वेळीच पावले उचलत सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत स्वखर्चाने गावातच ग्रामस्थांची मोफत तपासणी केली.त्यात तीनशे पैकी एक्कावन्न बाधित निघाले त्यावर उपचार सुरू आहेत -डॉ सगरकुमार ढोबे,सरपंच, टाकळी खंडेश्वरी ,ता कर्जत
You might also like