Tukaram Bij 2021 | जाणून घ्या तुकाराम बीज म्हणजे काय ,कशी साजरी करतात तुकाराम बीज । तुकाराम बीज 2021
तुकाराम बीज 2021 | जाणून घ्या तुकाराम बीज म्हणजे काय ,कशी साजरी करतात तुकाराम बीज
तुकाराम बीज 2021 :
या वर्षी तुकाराम बीज ही 30 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे ,तुकाराम बीज देहू इथे मोठा उत्सव साजरा केला जातो .या दिवशीच संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले ,ज्या नादरुकीच्या झाडाखाली त्यांनी वैकुंठला जाण्याअगोदर ध्यान केले ते अजूनही देहू या ठिकानि आहे .संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म माघ शुद्ध वसंत पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकोबा एका सुखवस्तू घरात जन्माला आले. त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनाव अंबिले. तीन भावांमध्ये तुकोबा मधले. थोरला भाऊ थोडासा विरक्त. घर-प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या. आईवडील गेले, थोरल्याची बायको गेली, तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रखमाबाईही गेली. सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जातात, तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर-संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्यागही करतात. इथेच तुकोबांचे थोरपण आहे. तुकोबा हरिचिंतनात निमग्न झाले. आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले. भगवद्भक्तीची पताका खांद्यावर घेऊन आसमंतात जनजागृतीचे वादळ निर्माण केले.
आह्मी जातो आपुल्या गावा, आमचा राम राम घ्यावा !!
तुमची आमची हेचि भेटी ,येथुनियां जन्मतुटी !!
जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी साष्टांग दंडवत !! 🙏
#तुकाराम_बीज
तुकाराम तुकाराम
नाम घेता कापे यम।
धन्य तुकोबा समर्थ
जेणे केला हा पुरुषार्थ।
#जगतगुरु_श्री_संत_तुकोबांच्या_चरणी_साष्टांग_दंडवत.
वेदाचा अर्थ कळण्याचा अधिकार इतर जातीतील लोकांना, तसंच सर्व स्तरांतील स्त्रियांनाही आहे.
सकळ शास्त्रांचे सार। हें वेदांचे गव्हर।
पाहतां विचार। हाचि करिती पुराणें।।
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळांही अधिकार।
बाळें नारीनर। आदिकरोनि वेश्याही।।
तुकाराम बीज कशी साजरी करतात : तुकाराम बीजे दिवशी अनेक ठिकाणी विविध प्रकारे साजरी केली जाते . ग्रामीण भागात ज्या ठिकाणी नांदुरुकीचे झाड आहे . तुकाराम महाराजांची पूजा करतात ,नंतर उपवास सोडला जातो .
घरी तुकाराम महाराजांची पुजा कशी कराल :
तुकाराम बीज फोटो :
तुकाराम महाराज फोटो :
संत तुकाराम महाराज अभंग :
तुकाराम बीज विशेष, निवडक अभंग Tukaram Bij Vishesh Abhanga अभंग । संत तुकाराम महाराज
माहिती सकाळी उपडेट केली जाणार आहे कृपया संपूर्ण माहितीसाठी सकाळी इथेच भेट द्या .