Loading Now

Vishrantwadi : विश्रांतवाडी येथील २६ वर्षीय महिलेचा शोध

Vishrantwadi : विश्रांतवाडी येथील २६ वर्षीय महिलेचा शोध

-शहर-मराठी-बातम्या--300x167 Vishrantwadi : विश्रांतवाडी येथील २६ वर्षीय महिलेचा शोध

पुणे शहर मराठी बातम्या .

पुणे: विश्रांतवाडी येथील २६ वर्षीय महिलेचा शोध

पुणे, दि. १६ डिसेंबर २०२३: पुणे शहरातील विश्रांतवाडी (Vishrantwadi) येथील २६ वर्षीय महिलेचा शोध सुरू आहे. दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १४.३० वाजता घरातून निघून गेलेल्या प्रेरणा दिपक यादव (वय २६) या महिलेचे अद्याप कुठेही निदर्शनास आले नाही.

प्रेरणा यांचे पती दीपक आनंद यादव यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची नोंद नं. ९१/२०२३ आहे.

हे वाचा – Happy New Year Wishes in Marathi 2024 : प्रेम, यश, आरोग्य घेऊन ये! गोड शुभेच्छा संदेश मराठीत

प्रेरणा या मध्यम उंचीच्या, गोऱ्या रंगाच्या, सरळ नाकाच्या, गोल चेहऱ्याच्या आहेत. त्यांची उंची अंदाजे ४ फूट १० इंच आहे. त्या चॉकलेटी रंगाचा टॉप, काळ्या रंगाची लेगीन्स आणि काळ्या रंगाची सँडल घालून घरातून निघून गेल्या होत्या. त्यांच्या गळ्यात १ तोळ्याचे मंगळसूत्र आहे. त्या मराठी आणि हिंदी भाषा बोलतात. त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले आहे.

प्रेरणा यांचा शोध घेण्यासाठी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तपास सुरू आहे. प्रेरणा यांबद्दल कोणतीही माहिती असल्यास विश्रांतवाडी पोलीस ठाणे (०२०-२६६८२५९०) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ad

Post Comment