WhatsApp DP कसा असावा ?

आपल्या ला बऱ्याच वेळी असं कळत नाही की व्हॉट्सअँप dp कसा असावा, आपण फोटो सतत बदलत असतो.कोरा या मराठी वेबसाईट वर विचारलेल्या प्रश्नाचे नारायण दामले यांनी दिलेले उत्तर

माझे असे ठाम मत आहे कि व्हॉट्सॲप डीपी मध्ये तुमचा स्वत:चा स्पष्ट ओळखता येईल असा चेहरा असावा.

ग्रुप फोटो, नवरा बायकोचा फोटो नसावा. कधीतरी एखाद्या वाढदिवस, अनिवर्सरी असा स्पेशल दिवशी एक दोन दिवस असला तर ठीक आहे.

फक्त “दुसऱ्या एकट्याचा” (किंवा अनेकांचाही) कुणाचाही फोटो बायको, नवरा, मुलगा, मुलगी, मित्र, मैत्रीण कधीही असू नये.

अशा कसल्याही करामती करायच्या असतील तर व्हॉट्सॲप स्टेटस वापरावा म्हणजे तो २४ तासानंतर आपोआप निघून जातो.

वरील सगळ्याचे कारण म्हणजे

१. आपण व्हॉट्सॲप हे एक वैयक्तिक संदेश माध्यम म्हणून वापरतो. त्याचे इतर करमणुकीसाठी (गैर) वापर होतात हि गोष्ट वेगळी.

२. बऱ्याच वेळा कुटुंबातल्या कुटुंबात फोन नंबर बदलतात त्यामुळे गैरसमज होऊ शकतो.

३. असे न केल्याने कधी कधी खाजगी संदेश दुसऱ्याच्या हातात पडू शकतात.

आता सांगतो मी काय करतो ते.

मी बऱ्याच वेळा दुसऱ्या एखाद्या जागी गेलो कि तिथल्या ओळखीच्या जागी एखादा सेल्फी व्हॉट्सॲप डीपी म्हणून वापरतो त्यामुळे मी सध्या कुठे आहे हेही कळते.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy