Pune : विश्रांतवाडी आळंदी रोडवर एक भीषण अपघात

0
Pune news

Pune news

pune  : अज्ञात कार चालकाच्या बेफिकीरपणामुळे अपघात, एकाचा मृत्यू

pune news: विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तक्रारीनुसार, २८ जून २०२४ रोजी रात्री २:३० ते ३:३० वाजेच्या सुमारास आर्मी पब्लिक स्कूल टी बी -२ च्या गेट नं. ३ समोर विश्रांतवाडी-आळंदी रोडवर गंभीर अपघात झाला. या अपघातामध्ये एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तक्रारदारासह दुसरा एकजण गंभीर जखमी झाला आहे.

तक्रारदार प्रतिक चांदारे (वय २१ वर्षे, रा. दिघी, पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात कार चालकाने वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, अविचाराने व भरधाव वेगात कार चालवली. स्पीड ब्रेकरवरून उडाल्यानंतर कारने रस्ता ओलांडून तक्रारदार चालवत असलेल्या दुचाकीला जोरात धडक दिली.

या अपघातामुळे तक्रारदाराचा मित्र स्वप्नील प्रदीप खरबडे (वय २६ वर्षे, रा. गजानन महाराज नगर, श्री राम कॉलनी, दिघी, पुणे) गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. तक्रारदार प्रतिक चांदारे देखील या अपघातात जखमी झाले आहेत. अपघातानंतर आरोपी चालक अपघाताचे ठिकाणी न थांबता पळून गेला आहे.

या घटनेची नोंद विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात भादविक २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ), मोव्हिॲक्ट १८४, ११९/१७७, १३२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपी चालकाचा शोध घेत असून, या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.


ताज्या घडामोडी आणि माहिती मिळवण्यासाठी, पुणे सिटी लाईव्ह मीडियाशी संपर्क साधा:

ईमेल: [email protected] फोन: 8329865383

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *