
कॉलेज चे राहिले होते १० दिवस ,अमरावती तिल २४ वर्षीय तरुणाची अमेरिकेत हत्या !

Indian Student Murder : भारतीय विद्यार्थी साईश याचे ग्रॅज्युएशन अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपले होते. तो पुढच्या दोन आठवड्यांत फ्यूएल स्टेशनवरील नोकरीही सोडणार होता. इतक्यातच त्याचा खून झाला आहे .
अमेरिकेत पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असलेल्या भारतीय तरुणाची हत्या करण्यात आली. इंधन पंपावर झालेल्या गोळीबारात २४ वर्षीय साईश वीरा याला प्राण गमवावे लागले. तो आंध्र प्रदेशातील अमरावती येथील मूळ रहिवासी होता. अमेरिकेतील ओहायो राज्यातील पोलिसांनी याविषयी माहिती दिली.