प्रिय पुणेकर नागरिक व इतर नागरी संघटना..
ऑगस्ट क्रांतीदिनाच्या सुमुहूर्तावर बुधवार ९ ऑगस्ट रोजी *चलो पीएमसी* या नागरी चळवळीत सहभागी होऊन *सुंदर व स्वच्छ पुणे* हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी झटूया..
त्यासाठी पुढे नमूद केलेल्या १० बाबींपैकी तुम्हाला भेडसावणाऱ्या बाबींवर खूणा करा..
१. तुम्ही टॅंकर द्वारा पाणी विकत घेता का?
२. आपल्या घरगुती पाणीवापरातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यामुळे नद्या प्रदूषित होतात असे तुम्हाला वाटते का?
३. नदी किंवा सखल भागात येणाऱ्या पुरामुळे तुम्ही व तुमचे शेजारी बाधित होता का?
४. भविष्यात येऊ घातलेल्या तीव्र हवामान बदलांबाबत तुम्हाला चिंता वाटते का?
५. तुमची मुले आरोग्यपूर्ण असावीत याबद्दल तुम्हांस काय वाटते?
६. सोलापूरकरांना पुण्यातील सांडपाण्याचा पुरवठा होण्याविषयी तुमचे मत काय आहे?
७. स्वछ सुंदर नैसर्गिक अशी आपली नदी असावी असे तुम्हांस वाटते का?
८. नदीमधील जलचरांच्या जगण्याच्या अधिकाराबद्दल आपण काय म्हणाल?
९. ज्या नदीचे पाणी आपण पितो तिचा आपल्याकडून होणाऱ्या अनादराची तुम्हाला चिंता वाटते का?
१०. आपणा करदात्यांच्या पैशाचा पुणे मनपाकडून होणाऱ्या वापराविषयी तुम्ही चिंतीत आहात का?
वरीलपैकी एकापेक्षा अधिक बाबींवर जर तुम्ही खूणा करत असाल तर तुम्ही ९ ऑगस्टच्या नागरी चळवळीत सहभागी होणे आवश्यक आहे..
ऑगस्ट क्रांती दिनाच्या समुहूर्तावर आंदोलन, या साठी करतील आंदोलन!
On: August 8, 2023 7:30 AM
---Advertisement---




