पुणे, 29 ऑगस्ट 2023: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या 40% शुल्काच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राजगुरू नगर येथे रास्तारोको आंदोलन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला. त्यांनी सरकारला लवकरात लवकर हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली.
या आंदोलनादरम्यान पोलिस प्रशासनाने युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रभारी उदय भानू, सहप्रभारी एहसान खान, प्रदेश महासचिव श्रीनिवास नालमवार, प्रदेश प्रवक्ते दीपक राठोड, युवक काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र संघटन प्रमुख अक्षय जैन, पश्चिम महाराष्ट्र संघटन सहसमन्वयक ऋत्विक धनवट, प्रदेश सचिव अनिकेत आरकडे, शुभम बुराडे, विश्वजीत जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सौ.वंदना सातपुते, किसान काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष चंद्रकांतजी गोरे, पुणे जिल्हा काँग्रेस लीगल सेल अध्यक्ष ऍड. जया मोरे, खेड तालुका पंचायत समिती माजी उपसभापती सतीशजी राक्षे, किसान सेल तालुकाध्यक्ष सुभाष होले, काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय डोळस,युवक काँग्रेस खेड तालुकाध्यक्ष अमोल दौंडकर,उपाध्यक्ष निखिल ठिगळे, कार्याध्यक्ष गणेश सहाणे, सचिव धनेश म्हसे, चाकण शहराध्यक्ष मयूर आगरकर उपस्थित होते.
या आंदोलनावरून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.