तिरसाट चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास ओटीटीवर

तिरसाट चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास ओटीटीवर

मुंबई, २६ ऑगस्ट २०२३ – प्रेमाचा नवा हळवा प्रवास मांडणारा तिरसाट हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२३ रोजी अल्ट्रा झकास ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाची कथा बाळू आणि समी या दोन तरुणांच्या प्रेमावर आधारित आहे. बाळूला समी आवडते, पण समी त्याला नाकारते. यामुळे बाळू खूप दुःखी होतो आणि आत्महत्या करण्याचा विचार करतो. त्याचे वडील त्याला थांबवतात आणि त्याला जीवनाचे महत्त्व पटवून देतात. बाळू आत्महत्या करण्याचा विचार सोडून देतो आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. तो उद्योजक बनतो आणि समीची प्रशंसा मिळवतो.

हे वाचा –PMPML च्या धोकादायक बसेसमुळे प्रवाशांना धोका !

चित्रपटाचे संगीत पी. शंकरन यांनी दिले आहे. या चित्रपटातील गाणी खूपच सुंदर आहेत आणि त्या चित्रपटाच्या कथेला अधिक भावनिक बनवतात.

अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.इ.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात सांगितले की, “प्रत्येक महिन्यात एक नवा चित्रपट या शृंखलेतील, तिरसाट हा चित्रपट खूपच भावनिक असून या चित्रपटातील कथानक, पात्र आणि गाणी प्रेक्षकांना नक्कीच भावतील. हा चित्रपट अल्ट्रा झकास या आमच्या मराठी ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद होत असून आमच्या इतर चित्रपटांप्रमाणे तिरसाटलाही रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम देतील अशी आशा आहे.”

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment