---Advertisement---

Tukaram bij 2023 date: जाणून घ्या तुकाराम बीज म्हणजे काय ,कशी साजरी करतात तुकाराम बीज । तुकाराम बीज २०२३

On: March 6, 2023 4:19 PM
---Advertisement---

Tukaram bij 2023 date : या वर्षी तुकाराम बीज ही ९  मार्च रोजी साजरी केली जाणार आहे ,तुकाराम बीज देहू इथे मोठा उत्सव साजरा केला जातो .या दिवशीच संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले ,ज्या नादरुकीच्या झाडाखाली त्यांनी वैकुंठला जाण्याअगोदर ध्यान केले ते अजूनही देहू या ठिकानि आहे .संत  तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म माघ शुद्ध वसंत पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकोबा एका सुखवस्तू घरात जन्माला आले. त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनाव अंबिले. तीन भावांमध्ये तुकोबा मधले. थोरला भाऊ थोडासा विरक्त. घर-प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या.

आईवडील गेले, थोरल्याची बायको गेली, तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रखमाबाईही गेली. सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जातात, तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर-संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्यागही करतात. इथेच तुकोबांचे थोरपण आहे. तुकोबा हरिचिंतनात निमग्न झाले. आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले. भगवद्भक्तीची पताका खांद्यावर घेऊन आसमंतात जनजागृतीचे वादळ निर्माण केले.

 

आह्मी जातो आपुल्या गावा, आमचा राम राम घ्यावा !!

तुमची आमची हेचि भेटी ,येथुनियां जन्मतुटी !!

जगद्‌गुरू तुकोबारायांच्या चरणी साष्टांग दंडवत !!

म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी ?

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment